

मुंबई लोकलमध्ये मराठीला बंदी
मध्य रेल्वेवर भाषाविषयक दुर्लक्षाचा ठपका
भाषा धोरणाचे उल्लंघन झाल्याची चर्चा
मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
राज्यात मराठीची गळचेपी थांबण्याचं नाव नाही. अशातच मुंबई लोकलमध्ये मराठीला बंदी घालण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. रेल्वे प्रशासनाला मराठीचा तिरस्कार का आहे? नेमकं काय घडलयं. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी बंद डब्यांची नॉन एसी लोकल मुंबईत दाखल झाली. मात्र याच नव्या लोकलमधून चक्कं राजभाषा मराठीलाच हद्दपार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. हीच ती मुंबईची नवी लोकल. दरवाजे बंद होणाऱ्या याच नव्या लोकलच्या आत फक्त हिंदी आणि इंग्रजीतून सुचना लिहील्या आहेत. मात्र मराठीला चक्कं लोकलमधून हद्दपार केलंय. एवढंच नाही तर मराठी भाषिकांचा उद्रेक होण्याच्या भीतीतून लोकल डब्यांच्या बाहेर तोंडी लावण्यापुरता मराठीचा वापर केलाय. मात्र त्यातही मराठी भाषेची ऐशीतैशी केलीय.
हा व्हिडीओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. मध्य रेल्वेनं लोकलच्या डब्याच्या बाहेर लिहिलेलं हे मराठी वाचा. सकाळीच्या ऐवजी सकाली. चोवीसऐवजी चौबीस असा हिंदीमिश्रीत भेसळ केलीय. तर फक्त ऐवजी फकतक्त असं लिहून ठेवलंय. आता मध्य रेल्वेला मराठी येत नाही की जाणून बुजून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा डाव आहे? याच मुद्द्यावर ठाकरेसेना चांगलीच आक्रमक झालीय.
खरंतर राज्यघटनेच्या कलम 345 अंतर्गत राज्याची अधिकृत भाषा आणि राज्य सरकारच्या भाषा धोरणांतर्गत महाराष्ट्रात मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये सूचना असाव्यात, असा नियम आहे. मात्र मध्य रेल्वेनं हा नियमच धाब्यावर बसवून राज्यभाषेला -मराठीलाच चक्कं नव्या लोकलमधून बेदखल केलंय. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं आता रेल्वेनं काय सारवासारव केली.
मध्य रेल्वेकडून मराठीला नाकारण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. तर याआधीही रेल्वे महोत्सवात मराठीला डावलंल होतं. मराठी माणसांच्या पैशावर चालणाऱ्या लोकल सेवेत मराठीचा अपमान का? अभिजात मराठीला सातत्यानं दुय्यम वागणूक का? मराठीबाबत अधिकाऱ्यांच्या मनात एवढी मळमळ का? असे अनेक प्रश्न आहेत. मध्य रेल्वेची मराठीबाबतची भूमिका हा फक्त भाषेचा मुद्दा नाही. तर हा मुद्दा आहे मराठी माणसांच्या मराठी मनाच्या अस्मितेचा. त्यामुळे मराठीला डावलणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.