Pod Taxi : प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबईकरांच्या सेवेत येणार पॉड टॅक्सी; कुठून कुठे धावणार? वाचा

Mumbai BKC Pod Taxi News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ३ एप्रिलपासून कुर्ला ते वांद्रे दरम्यान ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे ट्रॅफिक कोंडी कमी होऊन प्रवास जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
Pod Taxi : प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबईकरांच्या सेवेत येणार पॉड टॅक्सी; कुठून कुठे धावणार? वाचा
Mumbai BKC Pod Taxi NewsSaam Tv
Published On
Summary
  • ३ एप्रिलपासून मुंबईत पॉड टॅक्सी सेवा सुरू

  • कुर्ला ते वांद्रे मार्गावर धावणार

  • ड्रायव्हरलेस आणि इको-फ्रेंडली सुविधा

  • ट्रॅफिक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प

मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या ३ एप्रिल रोजी पॉड टॅक्सीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही पॉड टॅक्सी कुर्ला ते वांद्रा स्थानकादरम्यान धावणार असून वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे प्रवाशांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना कामाच्या ठिकाणी खूप जास्त प्रवास करावा लागतो. यामुळे अनेकदा कामाच्या कालावधीत ट्राफिकचा सामना करावा लागतो. यामुळे वाहतूकीवरील वाढता ताण कमी करण्यासाठी पॉड टॅक्सी सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ३ एप्रिल रोजी याचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ही टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

Pod Taxi : प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबईकरांच्या सेवेत येणार पॉड टॅक्सी; कुठून कुठे धावणार? वाचा
Shocking : जिम ट्रेनरचा झुडपात आढळला मृतदेह, १४ दिवसांपासून होता बेपत्ता; सोलापुरात खळबळ

याचा सर्वात मोठा फायदा कुर्ला ते वांद्रे दरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. पॉड टॅक्सी' ही ऑटोमेटेड इलेक्ट्रिक व्हेईकल आहे जी विनाड्राइवर एका टॅक्सीत एका वेळी सुमारे ८ प्रवासी बसू शकतात आणि १३ उभे राहून प्रवास करू शकतात.जगातल्या सर्वात मोठ्या पॉड टॅक्सी सेवेसाठी ८१० कोटी रुपयांचे बजेट यमुना ऑथोरिटीने मंजूर केले होते.

Pod Taxi : प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबईकरांच्या सेवेत येणार पॉड टॅक्सी; कुठून कुठे धावणार? वाचा
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?

भारतात नोएडामध्ये पहिली पॉड टॅक्सी जेवर विमानतळ ते फिल्मसिटीपर्यंत धावणार आहे. या पॉड टॅक्सीची विशेष बाब म्हणजे ती ड्रायव्हरलेस आणि ऑटोमेटेड तर आहेच पण त्याचबरोबर फास्ट आणि इको-फ्रेंडली देखील आहे. ३ एप्रिल रोजी पॉड टॅक्सीसोबत काशीगाव आणि दहिसर दरम्यान मेट्रो लाईन ९ आणि डायमंड गार्डनर ते मंडाले मेट्रो ३ या लाईन्सच्या पहिल्या टप्प्याचे ३ एप्रिल रोजी उद्घाटन होणार आहे. या प्रक्रल्पामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com