सोलापुरात बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला
फिटनेस ट्रेनर सचिन माने यांची ओळख पटली
१४ दिवसांपासून बेपत्ता होते
आत्महत्या की खून? पोलिसांचा तपास सुरू
सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका 30 वर्षे युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. सैफुल येथील एका झाडाला गळफास घेऊन घेतलेल्या स्थितीत आढळून आला. सदर युवक हा १४ दिवसापासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार विजापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. सचिन मच्छिंद्र माने असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी खून झाला असावा असा संशय असून, पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन माने हे फिटनेस ट्रेनर होते. १४ मार्च पासून सचिन माने हा पत्नी कल्याणी हिला अर्धा तासात घरी येतो म्हणून निघून गेले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. २७ मार्च रोजी बेपत्ता झाल्याची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
शुक्रवारी सैफुल येथील आधार हॉस्पिटलपासून एक किलोमीटर अंतरावरील झुडुपात सागवान झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. बांधकामासाठी वापरात असलेल्या प्लास्टिक पाइपने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्याच परिसरात त्याची दुचाकीही होती. माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह उतरवला.
शासकीय रुग्णालयात हलवले. शवविच्छेदनानंतर आत्महत्या की खून याचा उलगडा होईल, असे पोलिस म्हणाले. खुनाच्या दिशेनेही तपास सुरू केल्याचे सांगितले. सचिन माने यांच्या मागे पत्नी कल्याणी, तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा परिवार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.