Shocking : २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आईच्या लिव्ह-इन पार्टनरचं भयंकर कृत्य, पीडिता गरोदर राहिली

Gujrat Crime News : गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात लिव्ह-इन पार्टनरकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
Shocking : २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आईच्या लिव्ह-इन पार्टनरचं भयंकर कृत्य, पीडिता गरोदर राहिली
Gujrat 2 Girls Rape By Mother Live In PartnerSaam Tv
Published On
Summary
  • नवसारीत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रकार

  • आरोपी लिव्ह-इन पार्टनर

  • पोलिसांनी अटक केली

  • एका मुलीच्या गर्भधारणेमुळे प्रकरण उघड

  • मुलींच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न

Gujrat 2 Girls Rape By Mother Live In Partner गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात एका महिलेसोबत लिव्ह-इन पार्टनरमध्ये राहणाऱ्या तरुणाने तिच्याच दोन मुलींवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे यातील एक मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ३८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या सहा वर्षांपासून चिखली तालुक्यात एका महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या महिलेचा सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. महिलेला आधीच्या नवऱ्यापासून दोन मुलं आणि दोन मुली आहेत.

Shocking : २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आईच्या लिव्ह-इन पार्टनरचं भयंकर कृत्य, पीडिता गरोदर राहिली
Shocking : 'खरात'सारखाच आणखी एक इंजेक्शनवाला बाबा! उपचाराच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

महिलेच्या एका मुलीने तिच्याकडे पोटदुखीची तक्रार केली, तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीत १४ वर्षांची मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर दोन्ही मुलींनी सांगितले की, आरोपीने गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला होता.

Shocking : २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आईच्या लिव्ह-इन पार्टनरचं भयंकर कृत्य, पीडिता गरोदर राहिली
Shocking : २ बायकांपासून १८ मुलं, तरीही माजी सरपंच तिसरीच्या प्रेमात पडला, गर्लफ्रेंडने भेटायला बोलावून केलं भयंकर कृत्य

याप्रकरणी महिलेने तातडीने पोलीस ठाणे गाठत पार्टनर विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेची गांभीर्यता लक्षात घेत आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस याप्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत. दरम्यान महिलेच्या दुसऱ्या पीडित मुलीची देखील वैद्यकीय तपासणी सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com