Shocking : २ बायकांपासून १८ मुलं, तरीही माजी सरपंच तिसरीच्या प्रेमात पडला, गर्लफ्रेंडने भेटायला बोलावून केलं भयंकर कृत्य

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे माजी सरपंचाची प्रेयसीने भावाच्या मदतीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsSaam tv
Published On
Summary
  • प्रतापगडमध्ये माजी सरपंचाची निर्घृण हत्या

  • प्रेयसी आणि तिच्या भावाचा सहभाग उघड

  • मृतदेह कालव्यात सापडला

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू

उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे गावचा माजी सरपंच आणि १८ मुलांच्या वडिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सरपंचाचा रविवारी २२ मार्च रोजी मृतदेह सापडला. पोलीस तपासात सरपंचाच्या गर्लफ्रेंडनेच त्याची हत्या केल्याचे उघड झाले असून अनेक धागे दोरे पोलिसांच्या हाती लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सरपंचाचे नाव गुलहसन उर्फ ​​मुन्ना असे आहे. ते मिश्रपूर मुस्तर्का गावचे माजी सरपंच होते. त्यांना दोन पत्नी असून त्यांच्यापासून त्यांना १८ मुलं आहेत. मात्र गुलहसनचे सुमन देवी नावाच्या महिलेसोबत बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. सुमनने म्हटले की, गुलहसन तिला सतत ब्लॅकमेल करत होता आणि भेटण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता.

Uttar Pradesh Crime News
Political News : आधी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, आता पोलिसांकडून अटक; बड्या नेत्याला बेड्या ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

या त्रासाला कंटाळून सुमनने १८ मार्च रोजी गुलहसनला भेटण्याच्या बहाण्याने जेटवाडा येथील बागियापूरमध्ये बोलावले. सुमनचा भाऊ आणि त्याचा मित्र तिथे आधीच वाट पाहत होते. गुलहसन येताच सुमनच्या भावाने गुलहसनच्या डोक्यात लोखंडी सळीने वार करून हत्या केली.

Uttar Pradesh Crime News
Shocking : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल उघड; २५ हून अधिक मुलींचे शोषण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

त्याची ओळख लपवण्यासाठी मृतदेह एका पोत्यात कोंबून शारदा नदीच्या कालव्यात फेकून देण्यात आला. मात्र गुलहसन चार दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलीस तपासाला वेग आला आणि पोलिसांनी हत्ये मागच्या खऱ्या सूत्रधाराचा चेहरा समोर आणला. दरम्यान सुमनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com