Shocking : 'खरात'सारखाच आणखी एक इंजेक्शनवाला बाबा! उपचाराच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

Madhya Pradesh Indore Crime News : इंदूरमध्ये एका डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार करून तिचे फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Madhya Pradesh Indore Crime News
Madhya Pradesh Indore Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • इंदूरमध्ये डॉक्टरकडून महिलेवर अत्याचार

  • फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली

  • पोलीस तपास सुरू

मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एका डॉक्टरने उपचार करतो सांगून महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापजनक म्हणजे या डॉक्टरने महिलेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता काही महिन्यांपूर्वी पोटदुखीने गुजरखेडा येथील डॉ. सईद खान यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. डॉक्टरने तिला भूल देणारे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. नंतर, हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, तो तिला एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

Madhya Pradesh Indore Crime News
Shocking : २ बायकांपासून १८ मुलं, तरीही माजी सरपंच तिसरीच्या प्रेमात पडला, गर्लफ्रेंडने भेटायला बोलावून केलं भयंकर कृत्य

घडलेल्या घटनेबाबत पीडित महिलेने पोलिसांना आपबिती सांगितली. महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर काही लोकांनी महू येथील आरोपी डॉक्टरच्या घरावर हल्ला केला आणि तिथे पार्क केलेली त्याची दुचाकी जाळून टाकली. यानंतर, महू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय साहित्य कायद्याच्या संबंधित कलमांनुसार सहा नामनिर्देशित व्यक्ती आणि इतर काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Madhya Pradesh Indore Crime News
Political News : आधी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, आता पोलिसांकडून अटक; बड्या नेत्याला बेड्या ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी डॉक्टरच्या घरातील जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. पातालपाणी आणि गुजरखेडा भागातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे दोन्ही बाजूंची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com