Rakhi Sawant: ‘बिग बॉस मराठी 6’चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फिनालेसाठी खास तयारी करण्यासाठी राखीने थेट दुबई गाठून महागडे डिझायनर ड्रेस खरेदी केले आहेत. राखी सावंतने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये ती दुबईतील एका लक्झरी स्टोअरमध्ये दिसते आणि तेथील ड्रेसची किंमत ८ ते १० लाखांच्या दरम्यान असल्याचे सांगते.
यातील एक ड्रेस तिने खास ‘बिग बॉस मराठी 6’च्या ग्रँड फिनालेसाठी निवडला असून त्याची किंमत तब्बल १० लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे राखीने केवळ एकच नव्हे तर ४ ते ५ महागडे ड्रेस खरेदी केल्याचेही सांगितले आहे. प्रत्येक ड्रेसची किंमत लाखोंमध्ये असल्याने तिच्या या शॉपिंगची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पण राखीला तिचा प्रवास टॉप ७ पर्यंतचं पूर्ण करुन घराचा निरोप घ्यावा लागला होता. त्यामुळे आता ती या ड्रेसचं काय करणार असा मिश्किल प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर तिला करत आहे. यावर राखी उत्तर देत म्हणाली आहे, मी हा ड्रेस फिनालेला सगळ्या सदस्यांनी भेटायला जाताना नक्की घालणार आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी 6’चा ग्रँड फिनाले १९ एप्रिल रोजी पार पडणार असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता बिग बॉसला टॉप ५ स्पर्धक भेटले आहेत. तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद हे टॉप ५ स्पर्धक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.