Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत, लोकलसेवा ३० मिनिटं उशिराने; प्रवाशांची तुफान गर्दी, पाहा VIDEO

Mumbai News: मध्य रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. अर्धा तास लोकल उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे आजही कर्मचाऱ्यांना लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते सीएसएमटी रेल्वे स्थानकादरम्यान लोकलसेवा उशिराने सुरू आहेत. लोकल २० ते ३० मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. मुंबईच्या दिशेला कामाला निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. लोकल वेळत येत नसल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. आजही ऑफिसला जाण्यासाठी उशिर होणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांना लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी मुंबईच्या दिशेला जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. दिवा रेल्वे स्थाकावरील प्रवाशांच्या गर्दीचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रवासी लोकलची वाट पाहत उभे राहिले आहेत पण लोकल वेळेत येत नसल्यामुळे ते हैराण झाले आहेत. लोकल येत नसल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत चालली असून प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com