Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra Weather Rain Alert : राज्यात उष्णतेची लाट कायम असताना मुंबई, कोकण आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. अकोला आणि वर्ध्यात ४५ अंश तापमानाची नोंद. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता.
Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस;  मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे
Maharashtra Today Weather News Saam Tv
Published On
Summary
  • राज्यात उष्णतेचा कडाका कायम

  • अकोला-वर्ध्यात ४५° तापमान

  • बदलापूर, नांदेड, यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस

  • हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा कडाका कायम असून काही भागात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे. आज मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस असेच वातावरण कायम राहणार असून २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील अकोला आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उन्हाची झळ नागरिकांना सहन करावी लागणार आहे. बदलापूर, नांदेड, यवतमाळमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काल विदर्भातील अकोला आणि वर्धामध्ये देशातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज देखील हा उकाडा कायम राहणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दुसरीकडे आज मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील काही दिवस नागरिकांसाठी महत्त्वाचे असून यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे पावसापासून बचाव करण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन केले आहे.

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस;  मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे
Pune : पुण्यातील धक्कादायक घटना! भाजप नेत्याने केली महिलेची हत्या, विवाहबाह्य संबंधातून भयंकर कृत्य

बदलापूरमध्ये पावसाची हजेरी

आज सकाळच्या सुमारास बदलापुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.गेल्या दोन दिवसांपासून बदलापूर आणि ग्रामीण भागात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे होता. त्यानंतर आज सकाळी ढग भरून आले आणि बदलापूर परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका नोकरदार वर्गाला बसला आहे . सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत पावसाने हजेरी लावल्यामुळे चाकरमान्यांना भिजत भिजतच रेल्वे स्टेशन गाठावं लागलय.

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस;  मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे
Accident : हृदयद्रावक! भावाच्या उत्तर कार्यासाठी गावी निघालेल्या जोडप्यावर काळाचा घाला; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ

यवतमाळ, अमरावती, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाने रात्रीच्या सुमारास दमदार हजेरी लावली. या अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. नेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे झाडे आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. दरम्यान, या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असून विशेषतः तीळ पिकांवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com