

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे.
दिंडोशी आणि गोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा पूल
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा 'गोरेगाव-मुलुंड लिंक रोड' प्रकल्पाचा पहिला टप्पा महिना अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. यामुळे दिंडोशी आणि गोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे १.२ किमी लांबीचा उन्नत उड्डाणपूल आहे. हा पूल पश्चिम उपनगरातील दिंडोशी कोर्टाजवळून सुरू होतो आणि गोरेगावमधील फिल्म सिटी (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) येथे संपतो. हा उड्डाणपूल सहा पदरी आहे. या पुलावरून वाहनांची ये-जा वेगाने होणार आहे.
या पुलाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 'एलिव्हेटेड रोटरी' आहे. एका उंचावलेल्या प्लॅटफॉर्मवर वर्तुळाकार छेदनबिंदू तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे विविध दिशांना जाणारी वाहतूक वळवता येईल. सुरक्षिततेचा विचार करून पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रशस्त पादचारी मार्गही देण्यात आलेत.
दिंडोशी आणि फिल्मसिटी परिसरात सकाळ-संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. हा पूल सुरू झाल्यामुळे हा वेळ वाचेल. एकूण १२.२ किमी लांबीच्या या मार्गात भुयारी मार्ग आणि मोठ्या पुलांचा समावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगर थेट मुलुंड आणि पूर्व उपनगरांशी जोडले जाणार आहे. यामुळे मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेत मोठे परिवर्तन होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.