केडीएमसीतील शिंदेसेनेच्या नगरसेवकाची गुंडगिरी, नगरसेवक रमेश म्हात्रेंची महिला डॉक्टर्सना मारहाण

ShivSena Corporator Ramesh Mhatre-Doctor Assault Kdmc: लोकप्रतिनिधींचा माज काही केल्या कमी होत नाहीय... शिंदेसेनेच्या नगरसेवकानंही महिला डॉक्टर्सना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडलाय...मात्र नगरसेवकानं डॉक्टर्सना मारहाण का केली? नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
CCTV visuals capture KDMC corporator Ramesh Mhatre assaulting doctors and nurses inside Shastrinagar Hospital in Dombivli.
CCTV visuals capture KDMC corporator Ramesh Mhatre assaulting doctors and nurses inside Shastrinagar Hospital in Dombivli.saam tv
Published On

सत्तेचा माज नेमका काय असतो? यासाठी हा व्हिडिओ नीट पाहा......केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हा प्रकार घडलाय...हे मारहाण करणारे गृहस्थ दुसरे तिसरे कुणी नसून शिंदेसेनेचे स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे आहेत...गावगुंडांप्रमाणे नगरसेवक म्हात्रे रुग्णालयातील महिला डॉक्टरांना आणि नर्सना आपल्या कार्यकर्त्यांसह मारहाण करतायत...रुग्णालयातील महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि 3 महिला नर्सना मारहाण केल्याची हा प्रकार सीसीटिव्हीत कैद झालाय...त्यामुळे मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयातील नर्सना अश्रू अनावर झालेत..

मात्र डॉक्टर आणि नर्सना शिवीगाळ करत मारहाण करण्यामागे नेमकं कारण काय होतं? नगरसेवक म्हात्रेंना नेमकं काय खटकलं...पाहूयात...

एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात आणले होते. तपासणीनंतर बाळाला जन्मानंतर आयसीयूत उपचारांची गरज भासू शकते, असं डॉक्टरांनी सांगितलं. शास्त्रीनगर रुग्णालयातील सर्व आयसीयू बेड आधीच फुल होते.त्यामुळे बाळाच्या सुरक्षेसाठी डॉक्टरांनी महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. याच सल्ल्याचा राग आल्याने नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी डॉक्टरला मारहाण केल्याची माहिती समोर आलीय....म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी थेट रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना पकडून ठेवलं, जेणेकरून डॉक्टरांना वाचवायला कोणी येऊ नये...

सत्तेचा माज असल्यानुळे शासकीय कर्मचाऱ्यांना कायदा हातात घेऊन मारहाण करण्याचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला...या घटनेनंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारून नगरसेवक रमेश म्हात्रेंवर कारवाईची मागणी केली... अखेर साम टिव्हीच्या बातमीनंतर नगरसेवक रमेश म्हात्रे आणि कार्यकर्त्यांविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त अभिनय गोयल यांनी दिली....

लोकप्रतिनिधी कधी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करतात.. तर कधी रुग्णालयातील महिला डॉक्टरांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते...मात्र सत्तेचा हा माज नेमका येतो कुठून?

शासकीय रुग्णालयात रुग्णांचे पाण वाचवणाऱ्या डॉक्टरांवरच जर असे हल्ले होणार असतील, तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा?

शिंदेसेना अशा मस्तवाल नगरसेवकावर काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com