लोकलचा जीवघेणा प्रवास; वर्षभरात 2287 प्रवाशांचा मृत्यू, अपघाताचा आकडा हादरवणारा

local train accident : लोकलचा प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. वर्षभरात एकूण 2287 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
local train
Csmt to Panvel Saam Tv
Published On
Summary

मुंबई लोकल प्रवास दिवसेंदिवस धोकादायक ठरतोय

वर्षभरात लोकलच्या अपघातात २,२८७ प्रवाशांचा मृत्यू

दररोज १३ प्रवाशांचा लोकल अपघातात मृत्यू

लोकल ट्रेनचा प्रवास आता जीवघेणा ठरू लागला आहे. प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गर्दीच्या वेळेत प्रवाशांना लोकलमध्ये दोन्ही पाय व्यवस्थित ठेवण्यासाठी जागा नसते. याच गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून प्रवाशांच्या मृत्यूच्या घटना वाढू लागल्या आहेत. लोकलच्या वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत 2287 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

'सकाळ'च्या वृत्तानुसार, जीवनवाहिनी म्ङणून ओळखणाऱ्या लोकलचा प्रवास अनेकांसाठी जीवघेणा ठरतोय. उशिराने धावणाऱ्या ट्रेन, प्रवाशांची गर्दी, अपुऱ्या सुविधामुळे अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे.

local train
विमानाचा दरवाजा उघडलेला, निळी पँट घातलेला माणूस; सरपंचाने सांगितला अजितदादांच्या विमान अपघाताचा थरार

मागील वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रेल्वेवर तब्बल ४ हजार ८४१ अपघात घडले. या अपघातामध्ये २ हजार २८७ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर २ हजार ५५४ प्रवासी जखमी झालेत. लोकल ट्रेनच्या वेगवेगळ्या अपघातामध्ये दररोज १३ प्रवाशांचा मृत्यू होतोय. या आकडेवारीमुळे रेल्वे प्रशानाच्या अपयशाचे भयावह वास्तव समोर आलं आहे.

local train
मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

लोकलमधून पडून घडलेल्या दुर्घटनेच्या नोंदी प्रचंड आहेत. वर्षभरात १ हजार ७१३ घटना नोंदल्या गेल्या आहेत. यात एकूण ५२५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार १८८ प्रवासी जखमी झाले आहेत. लोकल ट्रेनची गर्दी, दरवाज्याला लटकून प्रवास, खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमुळे दुर्घटना घडण्याची मुख्य कारणे आहेत.

रुळ ओलांडताना होणारे अपघात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या प्रकारच्या एकूण १ हजार २९८ घटना घडल्या आहेत. तर यात १ हजार ६३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २३५ प्रवासी जखमी झाले आहेत. पूल आणि भुयारी मार्ग नसल्याने रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू होत आहे.

local train
Pune : तुझ्यामुळे ब्रेकअप झालं; मित्राकडून मित्रावर कोयत्याने घाव, रक्तरंजित थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

मुंबई उपनगरीय रेल्वे अपघात २०२५

स्त्रोत : मुंबई लोहमार्ग पोलीस

एकूण अपघात - ४,८४१

मृत्यू : २,२८७

जखमी : २,५५४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com