

जुन्या मैत्रिणीच्या फोनवरून पुण्यात दोन मित्रांमध्ये वाद
वादातून मित्राने मित्रावरच कोयत्याने जीवघेणा हल्ला
पुण्यातील कात्रज परिसरात ही रक्तरंजित घटना घडली
पुण्यात जुन्या मैत्रिणीला फोन करण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. पुण्यातील किरकोळ वादाचं रूपांतर भयंकर घटनेत झालं. वादातून मित्रानेच मित्रावर थेट कोयत्याने घाव केले. सपासप वार करून मित्राला गंभीर जखमी केलं. ही घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरात घडली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील जखमी तरुणाचे नाव आदित्य कांबळे असे आहे. तर हल्ला करणाऱ्या आरोपी चेतण चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. आदित्य आणि चेतन हे दोघेही चांगले मित्र होते. दोघे ही २ तारखेला भेटले. जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. त्या मैत्रिणीला फोन लावायचा की नाही, यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
तुझ्यामुळे ब्रेकअप झाला, असं एक मित्र म्हणाला. त्यानंतर त्याने थेट बाजूला असलेल्या रसवंती गृहात ठेवलेल्या कोयत्याने मित्रावर वार केले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पुण्याच्या कात्रजमधील सीसीटीव्हीमधून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. या व्हिडिओमुळे गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना घडली. चेतनने पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केले. एखादा व्यक्ती ज्या प्रकारे लाकूड तोडण्यासाठी घाव घालतो, तसे घाव या तरुणावर घालण्यात येत होते. पीडित तरुण वाचण्यासाठी पाया पडत गयावया करत होता. घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी होती.
पीडित तरुणाला कोणी वाचवण्यासाठी प्रयत्न केला नाही. आदित्य सुनिल कांबळे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आदित्यच्या डोक्यात 30 पेक्षा अधिक टाके पडल्याची माहिती आहे. खुनी हल्ल्याचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.