ajit Pawar plane
ajit Pawar plane accident videoSaam tv

विमानाचा दरवाजा उघडलेला, निळी पँट घातलेला माणूस; सरपंचाने सांगितला अजितदादांच्या विमान अपघाताचा थरार

ajit Pawar plane accident video : गोजूबावी सरपंचाने अजितदादांच्या विमान अपघाताचा थरार सांगितला. सरपंचांनी आज शरद पवारांची देखील भेट घेतली.
Published on
Summary

विमानतळाजवळ 28 जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघात

गोजूबावी गावचे सरपंच कल्याण आटोळे यांनी पाहिला अपघाताचा थरार

सरपंचांना झाला स्फोटापूर्वी विमानाचा दरवाजा उघडा असल्याचा भास

सचिन जाधव, साम टीव्ही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामती विमानतळावर विमान उतरत असताना अपघात झाला. ज्या परिसरात हा अपघात झाला तो परिसर आहे गोजूबावी हे गाव. या गावातील सरपंच कल्याण आटोळे यांनी विमान अपघात हा प्रत्यक्ष पाहिला आणि त्यानंतर त्यांना काही वेळ विमानाचा दरवाजा उघडा असल्याचं दिसलं. त्यातून निळी पॅन्ट असलेला एक व्यक्ती बाहेर येत असल्याचं काही सेकंद जाणवलं. मात्र तसं काही नव्हतं. त्यानंतर काही वेळात या विमानाचा भयानक असा स्फोट झाला आणि त्यानंतर त्या विमानात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

ajit Pawar plane
उत्तर प्रदेशमध्ये सत्ता समीकरण बदललं; ब्राह्मण समाजाच्या आमदारांच्या नाराजीनंतर भाजप करणार मोठे बदल

सरपंच कल्याण आटोळे म्हणाले, 'विमानात अजित पवार असतील, असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यानंतर बारामतीकडून अनेक अजित पवार यांचे जवळचे सहकारी आले आणि त्यानंतर आम्हाला या विमानात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची कळलं. मी त्या विमानाच्या जवळ होतो. त्यानंतर मला आजूबाजूच्या सहकाऱ्यांनी आवाज दिला, बाजूला सरका स्फोट होईल'.

ajit Pawar plane
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

'अपघाती विमान एखाद्या उद्योगपती किंवा व्हीआयपीचे असावे. मात्र ही दुर्दैवी घटना घडली आणि त्यात अजितदादांचा मृत्यू झाला. यासंदर्भात माझं आणि आमदार अमोल मिटकरी यांचे कुठलाही बोलणं झालं नाही, असं मत या ठिकाणी कल्याण आटोळे यांनी व्यक्त केले.

ajit Pawar plane
Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

आटोळे यांनी शरद पवारांना काय सांगितलं?

आज सरपंच आटोळे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी भेट घेऊन घडलेला अपघात दृश्य सांगितली. या अपघातानंतर पोलीस दल अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी मिळून त्या ठिकाणी असलेल्या मृतदेहांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हा स्फोट एवढा भयानक होता की, खाली पडल्यानंतर खूप मोठा आवाज आला. या विमानात अजित पवार असतील असे आम्हाला वाटले नव्हते.

'विमानाने अगोदर दोन वेळेस आकाशात घिरट्या घातल्या आणि त्यानंतर उतरत असताना हा अपघात झाला, असे ते पुढे म्हणाले. गोजूबावी गावचे सरपंच अपघात स्थळी होते त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com