Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadnavis Thackeray Vijay Melava : आज झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या झालेल्या विजयी मेळाव्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, 'दोघं भाऊ एकत्र येण्याचं श्रेय मला मिळत असेल तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो. यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळत असेल', असं फडणवीस यावेळी म्हणाले.
Devendra Fadnavis Thackeray Vijay Melava
Devendra Fadnavis Thackeray Vijay Melava Saam Tv News
Published On

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज वाखरी येथे जाऊन संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतलं. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांना मानाचा फेटा बांधून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. पूजा झाल्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यादरम्यान, आज झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या झालेल्या विजयी मेळाव्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, 'दोघं भाऊ एकत्र येण्याचं श्रेय मला मिळत असेल तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो. यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळत असेल', असं फडणवीस यावेळी म्हणाले. 'मराठीबद्दल एक शब्दही न बोलता, आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या. हा मराठीचा विजयी उत्सव नव्हता तर ही रुदाली होती, आणि तया रुदालीचं दर्शन आपण घेतलेलं आहे', अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

फडणवीस पुढे म्हणाले की, '२५ वर्ष महापालिका त्यांच्याकडे असताना ते काहीच काम करु शकले नाहीत. मोदींजीच्या नेतृत्वात आम्ही ज्याप्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला. त्यांच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. आम्ही बीडीडी साईटल्या मराठी माणसाला, पत्राचाळीतल्या मराठी माणसाला, अभ्यूद्यनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर त्याचठिकाणी त्यांना दिलं, आणि त्याची खदखद त्यांच्या मनामध्ये आहे. पण मी नेहमी सांगतो 'जनतेला सर्व माहितीय'. त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्यासोबत आहेत. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे. त्यामुळे आम्ही हिंदू आहोत. आमचं हिंदूत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं हिंदूत्व आहे', असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis Thackeray Vijay Melava
Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त, कारण काय?

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. ते म्हणाले की, 'मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना २०२२ मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला? याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाहीतर, ती धोरणात दिसली पाहिजे. पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं, आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात', असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis Thackeray Vijay Melava
Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com