मध्य रेल्वे मार्गावर १० तासांचा विशेष ब्लॉक, शेवटची लोकल किती वाजता सुटणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Central Railway 10 Hour Block April 19 Mumbai Details: मध्य रेल्वेकडून ठाणे-डोंबिवली दरम्यान १० तासांचा विशेष ब्लॉक जाहीर. लोकल गाड्यांवर परिणाम, शेवटच्या आणि पहिल्या लोकलच्या वेळा जाणून घ्या.
Mumbai local trains face disruption as Central Railway undertakes major platform expansion work between Thane and Dombivli.
Mumbai local trains face disruption as Central Railway undertakes major platform expansion work between Thane and Dombivli.saam tv
Published On

ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून आज (शनिवार) मध्यरात्रीपासून १० तासांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (१९ एप्रिल) रात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार असल्याने मध्य मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आजच्या शेवटच्या लोकलच्या वेळांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. ब्लॉकपूर्वीची शेवटची डाऊन धीमी लोकल सीएसएमटी-खोपोली ही रात्री १०.२८ वाजता सुटेल, तर अप दिशेतील शेवटची कसारा-सीएसएमटी लोकल कल्याणहून रात्री ११.१५ वाजता धावेल.

Mumbai local trains face disruption as Central Railway undertakes major platform expansion work between Thane and Dombivli.
Pune Crime: पुणे हादरले! समलिंगी संबंधाला विरोध केला, १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या

ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ तसेच डोंबिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ए, १ व २ यांच्या विस्तारासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे अनेक धीम्या लोकल गाड्या जलद मार्गावर वळविण्यात येतील. परिणामी, ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर काही गाड्या थांबणार नाहीत. कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्या शनिवारी रात्री ११.२६ ते ११.५२ आणि रविवारी पहाटे ३.२३ ते सकाळी ९.५५ दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. तसेच परळ, विद्याविहार आणि सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल गाड्यांनाही (रात्री १०.४९ ते पहाटे १२.१२ आणि सकाळी ४.४५ ते ९.०५) जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे.

Mumbai local trains face disruption as Central Railway undertakes major platform expansion work between Thane and Dombivli.
KDMC News: पगारासाठी कल्याण-डोंबिवलीतील सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

ब्लॉकदरम्यान काही जलद लोकल गाड्यांना दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्यात येतील. तसेच सर्व लोकल गाड्या सरासरी १५ मिनिटे उशिराने धावतील. मेल व एक्सप्रेस गाड्यांनाही वळविण्यात येणार असून, त्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावरून चालविण्यात येतील.

Mumbai local trains face disruption as Central Railway undertakes major platform expansion work between Thane and Dombivli.
Mumbai New Railway Line: मुंबईला मिळणार नवी रेल्वे लाइन; कल्याण-कसारा प्रवास होणार सुसाट; काय आहे प्लान?

शेवटची लोकल -

ब्लॉकपूर्वीची शेवटची डाऊन धीमी लोकल सीएसएमटी- खोपोली ही रात्री १०.२८ वाजता सुटेल. तर अप धीमी कसारा–सीएसएमटी लोकल कल्याणहून रात्री ११.१५ वाजता सुटणारी शेवटची असेल.

ब्लॉकनंतरची पहिली लोकल -

सीएसएमटी-कल्याण सकाळी ९.२६ वाजता सुटेल. तर अप दिशेने जाणारी पहिली लोकल टिटवाळा-परळ ही कल्याणहून सकाळी १०.०९ वाजता धावेल.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी होणारी गैरसोय लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai local trains face disruption as Central Railway undertakes major platform expansion work between Thane and Dombivli.
Mumbai Pune Expressway accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा अपघात, खालापूरजवळ कारचा चेंदामेंदा अन् रक्ताचा सडा, ३ जणांचा मृत्यू

१८ एप्रिल २०२६ अर्ध्यावरच थांबणाऱ्या लोकल

कुर्ला येथे:

* रात्री १०:०४ वा. - सीएसएमटी - कल्याण

* रात्री ११:१२ वा. - सीएसएमटी - ठाणे

ठाणे येथे:

* रात्री १०:०३ वा. - परळ - कल्याण

* रात्री ९:०० वा. - डोंबिवली - सीएसएमटी

* रात्री १०:१८ वा. - डोंबिवली - सीएसएमटी

कल्याण येथे:

* रात्री ११:१४ वा. - टिटवाळा - ठाणे

* रात्री ११:०८ वा. - आसनगाव - ठाणे

- १९ एप्रिल २०२६ – अर्ध्यावरच थांबणाऱ्या लोकल

कुर्ला येथे:

* मध्यरात्री १२:२४ वा. - सीएसएमटी - ठाणे

अर्धवट सुरू होणाऱ्या (शॉर्ट ओरिजिनेशन) लोकल

कुर्ला येथून:

* पहाटे ५:१६ वा. - ठाणे - सीएसएमटी (नियोजित वेळ ४:४८)

* पहाटे ५:२५ वा. - ठाणे - सीएसएमटी (नियोजित वेळ ५:०८)

* सकाळी ६:०३ वा. - ठाणे - सीएसएमटी (नियोजित वेळ ५:३७)

* सकाळी ६:१४ वा. - ठाणे - सीएसएमटी (नियोजित वेळ ५:४७)

* सकाळी १०:२५ वा. - ठाणे - सीएसएमटी (नियोजित वेळ ९:५७)

ठाणे येथून:

* सकाळी १०:२८ वा. - परळ - डोंबिवली (नियोजित वेळ ९:४८)

* सकाळी १०:३४ वा. - सीएसएमटी - कल्याण (नियोजित वेळ ९:३७)

* सकाळी ११:३३ वा. - सीएसएमटी - डोंबिवली (नियोजित वेळ १०:३४)

* सकाळी १०:१६ वा. - कल्याण - सीएसएमटी (नियोजित वेळ ९:४३)

* सकाळी ११:०७ वा. - टिटवाळा - सीएसएमटी (नियोजित वेळ १०:२०)

मुंब्रा येथून:

* पहाटे ५:११ वा. - ठाणे - कर्जत (नियोजित वेळ ५:००)

* पहाटे ५:४६ वा. - ठाणे - कर्जत (नियोजित वेळ ५:३५)

* सकाळी ६:२२ वा. - सीएसएमटी - अंबरनाथ (नियोजित वेळ ५:१६)

* सकाळी ६:४६ वा. - सीएसएमटी - अंबरनाथ (नियोजित वेळ ५:४०)

* सकाळी ७:२३ वा. - विद्याविहार - अंबरनाथ (नियोजित वेळ ६:४९)

* सकाळी १०:१७ वा. - ठाणे - कल्याण (नियोजित वेळ १०:०६)

* सकाळी १०:२२ वा. - सीएसएमटी - डोंबिवली (नियोजित वेळ ९:१६)

कल्याण येथून:

* पहाटे ५:५९ वा. - ठाणे - कर्जत (नियोजित वेळ ५:२७)

* सकाळी ६:१८ वा. - ठाणे - आसनगाव (नियोजित वेळ ५:४६)

* सकाळी ६:३९ वा. - सीएसएमटी - आसनगाव (नियोजित वेळ ५:१२)

* सकाळी ९:२८ वा. - ठाणे - टिटवाळा (नियोजित वेळ ८:५६)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com