Mumbai Pune Expressway accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा अपघात, खालापूरजवळ कारचा चेंदामेंदा अन् रक्ताचा सडा, ३ जणांचा मृत्यू

Mumbai Pune Expressway accident near Khalapur today : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खालापूरजवळ भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. अतिवेगात असलेल्या कारचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, सलग अपघातांमुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Mumbai Pune Expressway news
Mumbai Pune Expressway news
Published On

Mumbai Pune highway Khalapur accident today details : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईकडे येताना खालापूर-पनवेल यादरम्यान अपघाताची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कारमधील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवाराही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला होता. चार ते पाच वाहनांची एकमेकांना धडक होऊन झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी झाले होते. आज पुन्हा एकहा भीषण अपघाताची घटना घडली. (Mumbai Pune Expressway news)

गुढी पाडव्याच्या दिवशीच मुंबई-पुणे एकस्प्रेसवेवर भीषण अपघात झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी पोलो कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. खालापुर ते पनवेल दरम्यान मुंबई लेनवर सकाळी अपघात झाला. कार अतीवेगात ओव्हर टेक करत असताना काळाने घाला घातला. अतिवेगात असल्याने कार पलटली आणि अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काल सकाळी देखील मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अशाच प्रकारे गंभीर अपघात झाला होता. आज पुन्हा एकदा खालापूरजवळच अपघात झाल्याने हळहळ व्यक्त कऱण्यात येत आहे.

Mumbai Pune Expressway news
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भयंकर अपघात, ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या, ३ जणांचा जागीच मृत्यू

आज सकाळी मुंबईकडे येताना पोलो कारचा भीषण अपघात झाला. अतिवेगात कार ओव्हरटेक करत होती. त्यावेळी कार पलटलली अन् भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. कारमधील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मुंबईकडील मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटानस्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केलीच. अपघातामधील ३ जणांचे मृतदेह जवळच्या रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून तपास केला जात आहे.

Mumbai Pune Expressway news
Accident : फिरायला गेले अन् परतलेच नाही, पिंपरीतील ३ मित्रांचा अपघाती मृत्यू, महागड्या कारचा चुराडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com