Vande Bharat Sleeper : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस, सोलापूरकरांनाही फायदा, वाचा तिकीट अन् थांबे

Vande Bharat sleeper train launch date : मुंबई-बंगळुरू प्रवास अधिक वेगवान होणार आहे. पुणेमार्गे वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस धावणार आहे. तिकीट दर, थांबे आणि वेळेची बचत किती होणार? याबाबत सविस्तर जाणून घ्या.
Vande Bharat sleeper train
Vande Bharat sleeper train launch date
Published On

Mumbai pune Bengaluru Vande Bharat Sleeper Train : देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस लवकरच धावणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची घोषणा केली होती. मुंबई-बंगळुरू या (Vande Bharat Sleeper Train) मार्गावर देशातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. याचा थेट फायदा पुणे आणि सोलापूरकरांना होणार आहे. पुणे आणि बंगळुरू, सोलापूर-पुणे-मुंबई या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना आता आणखी आरामदायी आणि वेगवान प्रवास करता येणार आहे. मुंबईहून बंगळुरूला जाणारी वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस कोणत्या स्थानकावर थांबणार? तिकिट किती असेल? वेळ किती वाचणार ? याबाबत जाणून घेऊयात..

पुणे-सोलापूरकरांना फायदा -

पुणे आणि बंगळुरू या मार्गावर प्रवास कऱणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याशिवाय सोलापूरहून मुंबई आणि पुण्याला अनेकजण ये जा करतात. त्या सर्वांसाठी ही एक्सप्रेस महत्त्वाची ठरणार आहे. पुणे ते बंगळुरू हा प्रवास १२ ते १३ तास पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या उद्यान एक्सप्रेससाठी १८ ते १९ तास लागतात. त्यामुळे या प्रवासात तर कोईंबतूर एक्सप्रेसने २० तासांचा प्रवास करावा लागतोय. पण वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसने हा प्रवास ६ ते ७ तासांनी कमी होणार आहे. बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचा सर्वाधिक फायदा सोलापूर आणि पुणे या दोन शहरांना होणार आहे.

Vande Bharat sleeper train
Vande Bharat Sleeper : महाराष्ट्राला मिळाली पहिली वंदे भारत स्लीपर, कुठून कुठे धावणार? कोणती स्थानके? वाचा A टू Z माहिती

१७ जानेवारी २०२६ रोजी देशाला पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस मिळाली होती. हावडा-कामाख्या या मार्गावर ही ट्रेन धावत आहे. ५ एप्रिल २०२६ रोजी देशातील दुसऱ्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्ण यांनी बंगळुरूचे खासदार पीसी मोहन यांना लिहिलेल्या पत्रात याची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि KSR बंगळुरू यादरम्यान ही नवीन स्लीपर ट्रेन धावणार आहे. ही राज्यातील पहिली आणि देशातील दुसरी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस असेल.

Vande Bharat sleeper train
Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १९ तासांचा प्रवास फक्त १३ तासांवर; पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार

तिकिट किती लागणार?

AC 3-टियर- जवळपास 2,500 रुपये

AC 2-टियर- जवळपास 3,000-3,200 रुपये

First AC- जवळपास 3,600-3,900 रुपये

महाराष्ट्रात धावणाऱ्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिटाचे दर अद्याप अधिकृत जाहीर झालेले नाहीत. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की जेवणाचा खर्च तिकीट दरातच समाविष्ट असेल.

Vande Bharat sleeper train
Maharashtra MLC elections : बिगुल वाजलं! विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुका जाहीर, वाचा संपूर्ण वेळापत्रक

स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग कसा असेल, कोणत्या स्थानकावर थांबणार ?

स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटी मुंबई येथून सुरू होणार आहे. त्यानंतर पुणे, सोलापूर आणि वाडीमार्गे बंगळूरुला जाईल. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, दौंड, गुंटकल मार्गांसह अनेक महत्त्वाचे विभाग आधीच यासाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गाडी १३० च्या वेगाने धावेल. कलबुर्गी किंवा हुबळीमार्गे जाणाऱ्या पर्यायी मार्गाचाही विचार केला जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही उद्यान एक्सप्रेससारख्या सध्या सुरू असलेल्या गाड्यांची जागा घेणार नाही. दोन्ही सेवा एकाच वेळी सुरू राहतील.

Vande Bharat sleeper train
Maharashtra Politics: शिवसेनेत मोठी उलथापालथ,संपूर्ण कार्यकारणीच बरखास्त; शिंदेंच्या तडकाफडकी निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com