Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १९ तासांचा प्रवास फक्त १३ तासांवर; पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार

Pune-Bengaluru Vande Bharat Sleeper Train: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यावरून थेट बंगळुरूला फक्त १३ तासांमध्ये पोहचता येणार आहे. लवकरच पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार आहे.
Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १९ तासांचा प्रवास फक्त १३ तासांवर; पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार
New Vande Bharat Sleeper Train NewsSaam Tv
Published On

Summary -

  • पुणेकरांसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेनची गुड न्यूज

  • प्रवास वेळ १९ तासांवरून १३ तासांवर येणार

  • १८० किमी वेगाने धावणारी आधुनिक ट्रेन

  • पुणे-बंगळुरू दरम्यान प्रीमियम प्रवास सुविधा

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांच्या सेवेत लवकरच वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस दाखल होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-बंगळुरू या मार्गावर वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला अधिकृत मंजुरी दिली असून ही ट्रेन पुण्याहून धावणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा बंगळुरूपर्यंतचा प्रवास सुसाट आणि आरामदायी होणार आहे. या ट्रेनमुळे पुणेकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

सध्या पुण्याहून बंगळुरूला जाण्यासाठी उद्यान एक्स्प्रेसने प्रवास करताना १८ तास १५ मिनिटे लागतात, तर कोईम्बतूर एक्स्प्रेसने प्रवास करताना १९ तास २० मिनिटे लागतात. मात्र वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसमुळे १३ तासांत बंगळुरू गाठता येणार आहे. जलद प्रवासामुळे प्रवाशांच्या वेळेत तब्बल ५ तासांहून अधिक वेळ बचत होणार आहे. पुण्याहून धावणारी ही पहिली वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस असणार आहे.

Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १९ तासांचा प्रवास फक्त १३ तासांवर; पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार
Pune : विनयभंगाच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी, प्राचार्याकडून उकळले लाखो रुपये; पुण्यात ३ पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा

रेल्वेमंत्र्यांनी नुकताच मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला मंजुरी दिली. ही ट्रेन कोणत्या मार्गावरून जाणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. तरी देखील ही ट्रेन पुण्यावरून धावणार असल्याचे निश्चित झाले आहे. ही ट्रेन पुणे, सोलापूर, वाडीमार्गे धावणार आहे. या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना प्रिमियम प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवासी रात्रभर प्रवास करतील आणि सकाळी ते बंगळुरूमध्ये पोहचतील.

Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १९ तासांचा प्रवास फक्त १३ तासांवर; पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार
Pune : ड्युटीला जातो सांगून घराबाहेर पडला अन् परतलाच नाही, पुण्यात सुरक्षारक्षकाने संपवलं आयुष्य

वंदे भारत स्लीपर ट्रेन १८० किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम असणार आहे. या ट्रेनमध्ये १६ आधुनिक डबे असून एकूण ८२३ प्रवासी एकाच वेळी यातून प्रवास करू शकणार आहेत. आरामदायी बर्थ, आधुनिक शौचालये आणि प्रगत निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान या ट्रेनमध्ये असणार आहेत. पुणे आणि बंगळुरू या दोन आयटी आणि व्यावसायिक शहरांना जोडणारी ही पहिली वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस असणार आहे. त्यामुळे पुणेकरांना ही ट्रेन कधी सेवेत येणार याची उत्सुकता लागली आहे.

Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १९ तासांचा प्रवास फक्त १३ तासांवर; पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार
Pune : पुण्यात रेस्क्यू केलेल्या १३ बांगलादेशी मुली पळाल्या, केअरटेकर अन् सुरक्षारकावर हल्ला केला नंतर...; VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com