Mumbai Pune Expressway : मोठी बातमी! पुण्याहून मुंबईला येणार्‍या सर्व एसटी बसेस रद्द, २१ तासांपासून एक्सप्रेस वे ठप्प, प्रवास टाळाच, कारण...

Pune Mumbai Expressway Traffic Update : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ केमिकल टँकर उलटून गॅस गळती सुरू असल्याने गेल्या २४ तासांपासून वाहतूक ठप्प आहे. आता एसटी बसेसच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
Mumbai Pune Expressway latest traffic update
Mumbai Pune Expressway latest traffic updateSaam TV marathi news
Published On

Mumbai Pune Expressway latest traffic update, Khandala Ghat accident news : पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत असाल तर थांबा... कारण, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगाच रागां लागल्या आहेत. मागील २० तासांपासून महामार्ग ठप्प झाला आहे. आडोशी भोगद्याबाहेर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण यातच आणखी एक चिंताजनक बातमी म्हणजे, पुण्याकडून मुंबईला येणाऱ्या सर्व एसटी बसेस रद्द कऱण्याचा निर्णय घेतला आहे. काही तासांसाठी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी रद्द करण्यात आल्या आहेत.

पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एस टी बसच्या फेऱ्या रद्द कऱण्यात आल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याने मोठी गळती सुरू होती. वाहतूक कोंडी अजूनही कायम असल्याने एस टी प्रशासनाने एसटीच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याहून मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवली कडे जाणाऱ्या सर्व एस टी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील काही तासासाठी बसेस फेऱ्या बंद राहणार आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या केमिकल टँकर अपघातानंतर आता परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. टँकरमधून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून एक्सप्रेसवे आणि जुना मुंबई-पुणे हायवे या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता गॅस वाहतूक करणारा टँकर कोसळला होता. अद्यापपर्यंत या मार्गावर वाहतूककोंडी आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गॅस गळतीमुळे दोन्ही महामार्ग ठप्प; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करा

प्रशासनाने प्रवाशांना लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून कऱण्यात आले आहे. या पर्यायी मार्गांमुळे प्रवासाचा वेळ ३ ते ५ तासांनी वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी सोबत पुरेसे इंधन आणि पाणी ठेवावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी एक्सप्रेसवे कंट्रोल रूम ९८२२४९८२२४ किंवा हायवे पोलीस ९८३३४९८३३४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही म्हटलेय.

ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई (दक्षिण मुंबईत जाणाऱ्यांसाठी).

माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे (उपनगरांकडे जाणाऱ्यांसाठी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com