Pune : ड्युटीला जातो सांगून घराबाहेर पडला अन् परतलाच नाही, पुण्यात सुरक्षारक्षकाने संपवलं आयुष्य

Pune Hadpasar News : पुण्यातील हडपसर परिसरात एका सुरक्षारक्षकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Pune : ड्युटीला जातो सांगून घराबाहेर पडला अन् परतलाच नाही, पुण्यात सुरक्षारक्षकाने संपवलं आयुष्य
Pune Hadpasar NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात हडपसरमध्ये सुरक्षारक्षकाची आत्महत्या

  • झाडाला गळफास घेतल्याची घटना उघड

  • मृताची ओळख ज्ञानेश्वर गाडेकर म्हणून पटली

  • आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

  • पोलीसांकडून सखोल तपास सुरू

सचिन जाधव, पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. हडपसर ग्लार्डिंग सेंटरच्या आवारातील एका झाडाला सुरक्षारक्षकाने ओढणीच्या साह्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. ज्ञानेश्वर शिवाजी गाडेकर ( वय २९, रा.पापडे वस्ती, फुरसुंगी मूळ रा. किल्लारी लातूर ) असे फाशी घेतलेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. या सुरक्षारक्षकाने का आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर शिवाजी गाडेकर हे हडपसर मधील एका कंपनीमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतात. गुरुवारी ते नेहमी प्रमाणे डबा घेऊन कामाला जातो म्हणून बाहेर गेले होते, मात्र ते कामावर गेलेच नाही. तसेच ते घरी देखील परतले नाहीत. काल म्हणजेच शुक्रवारी हडपसर ग्लायडिंग सेंटरच्या परिसरात एका सुरक्षारक्षकाने गळफास घेतल्याचं नागरिकांना दृश्य दिसलं. नागरिकांनी तातडीने पोलीस ठाण्यात माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Pune : ड्युटीला जातो सांगून घराबाहेर पडला अन् परतलाच नाही, पुण्यात सुरक्षारक्षकाने संपवलं आयुष्य
Crime News : "तू मला आवडतेस..." बीडमध्ये भररस्त्यात तरुणीचा विनयभंग; ओढणी ओढली अन्...

घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी तपास केला असता सुरक्षारक्षकाच्या खिशामध्ये काही वस्तू सापडल्या. या वस्तूंवरून त्याची ओळख पटवून पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर ज्ञानेश्वर शिवाजी गाडेकर यांचा मृतदेह शवाविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? याचे गूढ कायम आहे. पोलीस या घटनेचा सर्व अँगलने तपास करत आहेत. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com