Badlapur: ३०० पीडित महिला, एका अंडाशयामागे २० हजार रुपये; बदलापूर तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

Badlapur Ovary Trafficking Case: बदलापूरमध्ये अंडाशय तस्करी प्रकरणात ३ महिलांना अटक केली. हे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात ३०० पीडित महिला असल्याची माहिती समोर आली.
Badlapur: ३०० पीडित महिला, एका अंडाशयामागे २० हजार रुपये; बदलापूर तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Badlapur Ovary Trafficking CaseSaam Tv
Published On

Summary -

  • बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचे आंतरराज्यीय रॅकेट उघडकीस आले

  • ३०० हून अधिक गरीब महिला या प्रकरणात पीडित असल्याचा संशय

  • एका अंडाशयामागे २० हजार रुपये देण्यात येत होते

  • पोलिसांनी मुख्य आरोपीसह ३ महिलांना केली अटक

मयूरेश कडव, बदलापूर

बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अंडाशय तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला बदलापूरमधील गोरगरिब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे अंडाशय विकण्यास भाग पाडत होती. या प्रकरणात पोलिसांनी सुलक्षणा गाडेकरसह उल्हासनगरातील तिची साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे या ३ महिलांना अटक केली. याप्रकरणाच्या तपासातून एकएक धक्कादायक माहिती उघड होताना दिसत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात ३०० हून अधिक महिला पीडित आहे. या सर्व महिलांना अंडाशयामागे २० हजार रुपये दिले जात होते. तर मध्यस्थ महिलांना प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात येत होते अशी उघड झाली आहे. या अंडाशयांची केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती. पोलिसांनी मात्र या संपूर्ण तस्करी प्रकरणाबद्दल काहीही बोलण्यास नकार दिलाय.

Badlapur: ३०० पीडित महिला, एका अंडाशयामागे २० हजार रुपये; बदलापूर तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Badlapur : बदलापूरमध्ये महिलांच्या अंडाशयांची तस्करी, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; ३ महिलांना अटक

या अंडाशय तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर ही बदलापुरातल्या खरवईतील नॅनो सिटीत राहत होती. महिनाभरापूर्वीच ती याठिकाणी राहण्यास आली होती. या नॅनो सिटीतील सी विंगमध्ये ९०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये ती राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या नावाची पाटी देखील काढली. पोलिसांनी या महिलेच्या घराची झडती घेतली असता संशयास्पद इंजेक्शन सापडले. पोलिसांनी गाडेकरच्या घरातून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.

Badlapur: ३०० पीडित महिला, एका अंडाशयामागे २० हजार रुपये; बदलापूर तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Badlapur : बदलापूरमध्ये ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा; पुढील १० दिवस सुरु राहणार कारवाई

गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरने आपल्या घरातच साठवले होते. ती महिला गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन्स देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचे. त्यानंतर त्याची सऱ्हासपणे विक्री करण्यात येत होती.

Badlapur: ३०० पीडित महिला, एका अंडाशयामागे २० हजार रुपये; बदलापूर तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Badlapur : महिला पत्रकारावर हल्ला, बदलापूरमधील घटनेने खळबळ; भरदिवसा कार अडवली, काचा फोडल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com