ST BUS ने प्रवास करणाऱ्यांसाठी कामाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड काढावेच लागेल, किती आहे किंमत?

MSRTC Women Half Ticket New Rules Explained: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये सवलतीसाठी आता एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
Women and senior citizens stand in queue at an MSRTC counter to apply for the newly mandatory NCMC Smart Card for concessional ST bus travel.
Women and senior citizens stand in queue at an MSRTC counter to apply for the newly mandatory NCMC Smart Card for concessional ST bus travel.Saam Tv
Published On

एसटी बसमध्ये आधार कार्ड आणि साधे ओळखपत्र दाखवून अर्ध्या तिकीटात प्रवास करणाऱ्या महिला आणि शंभर टक्के सवलत घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांना आता सवलतीच्या प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक करण्यात आली आहे. हे कार्डघेऊनच आता लालपरीचा प्रवास करू शकणार आहे. त्यामुळे सुरुवातीला काही दिवस प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. या कार्डमुळे प्रवास आता सुलभ, सुरक्षित आणि पूर्णपणे पारदर्शक होणार असल्याचा दावा केला जात आहे. सवलतीची अचूक नोंद, रोखविरहित व्यवहार अंबई पारदर्शक व्यवहार ही तिन्ही वैशिष्ट्य एकाच कार्डमध्ये असतील. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने हा बदल केला आहे. कॅशलेस प्रवासाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Women and senior citizens stand in queue at an MSRTC counter to apply for the newly mandatory NCMC Smart Card for concessional ST bus travel.
Rain Alert : पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये 'उन्हाळ्यात पावसाळा'; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

सरकारने हा निर्णय पारदर्शकतेसाठी घेतला असला तरी ग्रामीण भागात चित्र वेगळे आहे. रांगेत उभे राहून कार्ड काढणे, ते वेळेवर रिचार्ज करणे आणि तांत्रिक अडचणी हाताळणे यामुळे ग्रामीण भागातील महिला आणि जेष्ठ नागरिकांचे हाल होऊ शकता. फक्त आधारकार्डवर मिळणारी सवलत आता इतकी अवघड करण्याचे कारण काय, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहे.

Women and senior citizens stand in queue at an MSRTC counter to apply for the newly mandatory NCMC Smart Card for concessional ST bus travel.
Sambhajinagar Crime : मुंबई, पुण्यानंतर घोटाळ्याचं लोण संभाजीनगरात, १५० जणांना TWJ कंपनीने कोट्यवधीला गंडवलं, वाचा घटनाक्रम

कार्ड कसे वापरणार?

प्रवाशांना एनसीएएमसी कार्डसाठी 199 रुपये मोजावे लागणार आहेत.

जुने स्मार्टकार्ड जमा केल्यास सवलतीच्या दरात म्हणजेच 149 रुपयांत नवीन कार्ड दिले जाणार आहे.

हे कार्ड केवळ ओळखपत्र नसून ते एक प्री-पेड वॉलेट असेल

यामध्ये किमान 100 रुपयांचा बॅलन्स ठेवणे बंधनकारक असेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com