Sambhajinagar Crime : मुंबई, पुण्यानंतर घोटाळ्याचं लोण संभाजीनगरात, १५० जणांना TWJ कंपनीने कोट्यवधीला गंडवलं, वाचा घटनाक्रम

Sambhajinagar Crime News : TWJ असोसिएट्स कंपनीने मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत छत्रपती संभाजीनगरमध्ये शेकडो गुंतवणूकदारांची १० कोटींपेक्षा अधिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी २४ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल असून पोलिस तपास सुरू आहे.
Sambhajinagar Crime : मुंबई, पुण्यानंतर घोटाळ्याचं लोण संभाजीनगरात, १५० जणांना TWJ कंपनीने कोट्यवधीला गंडवलं, वाचा घटनाक्रम
Sambhajinagar Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • TWJ कंपनीच्या गुंतवणूक योजनेत शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक

  • संभाजीनगरमध्ये १० कोटींपेक्षा अधिक रक्कम बुडाल्याचा अंदाज

  • २४ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल

  • बनावट परताव्याच्या आमिषाने सेमिनार व सोशल मीडियातून जाळे

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर शहरात गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून राज्यातील ११ हजार गुंतवणूकदारांना १२०० कोटींचा गंडा घालणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीने आता छत्रपती संभाजीनगरमध्येही १० कोटींचा गंडा घातल्याचे समोर आलं आहे. राज्यातील मुंबई, पुणे, कोकण आणि नागपूर या मोठ्या शहरातील टीडब्ल्यूजे घोटाळ्याचे लोण आता छत्रपती संभाजीगनर जिल्ह्यातही पसरले आहे. शहरातील ३४ गुंतवणूकदारांनी याबाबत पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, अमित बालम, किरण कुंडले या टोळीने जवळपास १५० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधींना गंडा घातला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात चौघांसह कंपनीच्या २४ जणांच्या टोळीवर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. टीडब्ल्यूजे या कंपनीमार्फत शेअर मार्केट, आयटी प्रोजेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प तसेच सरकारी कंत्राटांमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ३ ते ५ टक्के निश्चित परतावा मिळेल, असे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात येत होते. अवघ्या दोन ते तीन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीने अल्पावधीत गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आश्वासन देत विविध गुंतवणूक योजना राबवल्या.

Sambhajinagar Crime : मुंबई, पुण्यानंतर घोटाळ्याचं लोण संभाजीनगरात, १५० जणांना TWJ कंपनीने कोट्यवधीला गंडवलं, वाचा घटनाक्रम
पुण्यातील संतापजनक घटना! लॉजवर न्यायचं होतं, पण डोंगरवर नेलं; देहविक्री करणाऱ्या महिलेसोबत ६ जणांचं भयंकर कृत्य

सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून कोट्यवधी रुपये आरोपींनी हडपले. समीर नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, अमित बालम, किरण कुंडले यांच्यासह २४ जणांवर राज्यात पुणे, चिपळूण, यवतमाळ, नागपूर, रत्नागिरीसह एकूण १६ जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल होताच नार्वेकर, बालम गुजरातमध्ये पळून गेले होते. ठाणे पोलिसांनी त्यांना २९ जानेवारीला अटक केली. समीर व नेहा नार्वेकरने सर्वसामान्यांसोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी, राजकीय नेते, पोलिस अधिकारी, अंमलदारांनाही गंडा घातला.

Sambhajinagar Crime : मुंबई, पुण्यानंतर घोटाळ्याचं लोण संभाजीनगरात, १५० जणांना TWJ कंपनीने कोट्यवधीला गंडवलं, वाचा घटनाक्रम
Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांना लागणार शिस्त; अपघाताचं प्रमाण होणार कमी, काय आहे रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम?

छत्रपती संभाजीनगर शहरातील संतोष शेवाळे हा टीडब्ल्यूजे कंपनीच्या शहरातील शाखेत नोकरीला होता. प्रोझोन मॉलजवळील गोल्डन सिटी सेंटर येथे कंपनीने आलिशान कार्यालय थाटले होते. मार्च, २०२४ मध्ये समीर व नेहा नार्वेकर यांच्यासोबत त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांच्या प्रलोभनांना बळी पडून शेवाळे यांनी २९ लाखांची गुंतवणूक केली. यात त्यांना काही परतावा मिळालाही. फेब्रुवारी, २०२५ नंतर मात्र तो बंद झाला. त्यांच्यासह प्राथमिक स्तरावर ३८ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे ४ कोटी ३३ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार केली. प्रत्यक्षात शहर व जिल्ह्यात असे ३८० पेक्षा अधिक गुंतवणूकदार १० कोटींपेक्षा अधिक रक्कम या घोटाळ्यात गमावून बसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com