Shocking : धक्कादायक! आधारकार्ड, पॅनकार्डसह सरकारी डेटा चोरीला, देशांतर्गत टोळीचा रॅकेटचा पर्दाफाश
Jalna Crime NewsSaam Tv

Shocking : धक्कादायक! आधारकार्ड, पॅनकार्डसह सरकारी डेटा चोरीला, देशांतर्गत टोळीचा रॅकेटचा पर्दाफाश

Jalna Crime News : जालन्यात बनावट वेबसाईटद्वारे सरकारी डेटा चोरी होत असल्याचा मोठा सायबर घोटाळा उघड झाला आहे. आधार, पॅन आणि आरटीओ कार्यालयातील माहिती लीक प्रकरणात देशभरातून पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस सखोल तपास करत आहेत.
Published on
Summary
  • बनावट वेबसाईटद्वारे सरकारी डेटा चोरी प्रकरण उघड

  • ८० रुपयांत लर्निंग लायसन्स देण्याचा घोटाळा

  • आधार, पॅन व आरटीओ डेटा लीक झाल्याचे तपासात स्पष्ट.

  • देशभरातून पाच आरोपी अटकेत

अक्षय शिंदे, जालना

बँक अकाउंट, सोशल मीडिया अकाऊंट हॅक होणे यासारख्या घटना तुमच्या सोबतही होत असतीलच. तसेच वारंवार माहिती लीक होत असल्याच्या बातम्या देखील आपण ऐकतो. अशीच एक धक्कादायक घटना जालन्यातून समोर आली आहे. बनावट वेबसाईटद्वारे सरकारी डेटा चोरी होत आहे. याप्रकरणी जालना पोलिसांनी आतापर्यंत विविध देशातून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.

काही दिवसांपूर्वी जालन्यात आरटीओ कार्यालयाच्या प्रक्रियेला बायपास करून 80 रुपयांत बनावट वेबसाईटद्वारे लर्निंग लायसन्स दिले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी जालना सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सखोल तपास केला. या तपासात पोलिसांसमोर धक्कादायक बाब उघडकीस आली.

Shocking : धक्कादायक! आधारकार्ड, पॅनकार्डसह सरकारी डेटा चोरीला, देशांतर्गत टोळीचा रॅकेटचा पर्दाफाश
HSRP Number Plate : तुम्ही कार किंवा बाईकला लावलेली HSRP नंबर प्लेट बोगस तर नाही ना? ही बातमी वाचून 440 व्होल्टचा झटका बसेल!

या तपासात आधार कार्ड, पॅन कार्ड , राशन कार्ड,गॅस कार्डसह आरटीओ कार्यालयातील सरकारी डेटा चोरी होत असल्याचं पोलीस तपासात समोर आल आहे. जालना पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात देशातील विविध भागातून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Shocking : धक्कादायक! आधारकार्ड, पॅनकार्डसह सरकारी डेटा चोरीला, देशांतर्गत टोळीचा रॅकेटचा पर्दाफाश
Sambhajinagar News : 'आता उद्यापासून बांगड्या घालायला लावू' छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, काय आहे प्रकरण?

त्यामुळे हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे . दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अशा गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलीस तत्परतेने कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com