Sambhajinagar News : 'आता उद्यापासून बांगड्या घालायला लावू' छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, काय आहे प्रकरण?

Chhatrapati Sambhajinagar Savitrinagar School News : छत्रपती संभाजीनगरमधील सावित्रीनगर शाळेत विद्यार्थ्यांना मैदानात केस बांधण्याची शिक्षा दिल्याचा आरोप. व्हायरल फोटोमुळे शिक्षण विभागाची चौकशी सुरू असून पालकांकडून कठोर कारवाईची मागणी.
Sambhajinagar News : 'आता उद्यापासून बांगड्या घालायला लावू' छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, काय आहे प्रकरण?
Chhatrapati Sambhajinagar Savitrinagar School NewsSaam Tv
Published On
Summary
  • सावित्रीनगर शाळेत विद्यार्थ्यांना अपमानास्पद शिक्षा दिल्याचा आरोप

  • व्हायरल फोटोमुळे प्रकरण राज्यभर चर्चेत

  • शिक्षण विभागाकडून सखोल चौकशीचे आदेश

  • पालक व सामाजिक संघटनांकडून कठोर कारवाईची मागणी

  • विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीननगरमध्ये शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अमानवी आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर येथील एका शाळेत उघडकीस आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सर्वांसमोर खुल्या मैदानात रबर लावून केस बांधण्याची शिक्षा दिल्याचा प्रकार व्हायरल फोटोनंतर समोर आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या अपमानास्पद शिक्षेदरम्यान मुख्याध्यापकांनी 'आज केस बांधले, उद्यापासून लिपस्टिक लावू आणि बांगड्या घालायला लावू,' असे अत्यंत संतापजनक आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शब्दांमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले असून पालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, या घटनेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागही खडबडून जागा झाला.

Sambhajinagar News : 'आता उद्यापासून बांगड्या घालायला लावू' छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, काय आहे प्रकरण?
Accident News : भीषण अपघात! ट्रकवरील कंट्रोल सुटला, साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला पायी जाणाऱ्या भाविकांना उडवलं

शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मनपा शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, कनिष्ठ लिपिक आर. बी. कोलते आणि विशेष शिक्षक गणेश लक्कस यांच्या समितीने प्रत्यक्ष शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून शिक्षेचा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले आहे. समितीने प्राथमिक चौकशीत शाळेच्या व्यवस्थापनाकडून गंभीर चूक झाल्याचे नमूद करत शाळेला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.

Sambhajinagar News : 'आता उद्यापासून बांगड्या घालायला लावू' छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, काय आहे प्रकरण?
Political News : शिंदेसेनेच्या विजयी उमेदवाराच्या कारवर हल्ला, ठाकरेसेनेच्या जिल्हा प्रमुखासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल

या प्रकारामुळे परिसरातील पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अशा शिक्षणपद्धतींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com