Political News : शिंदेसेनेच्या विजयी उमेदवाराच्या कारवर हल्ला, ठाकरेसेनेच्या जिल्हा प्रमुखासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल

Alibaug ZP Election Win Sachin Raul Attack News : अलिबागमध्ये जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आला . या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam Tv
Published On
Summary
  • जिल्हा परिषद निकालानंतर अलिबागमध्ये राजकीय तणाव वाढला

  • विजयी उमेदवाराच्या गाडीवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला

  • गाडीच्या काचा फोडून कार्यकर्त्यांना मारहाण

  • ठाकरे गटाच्या नेत्यांसह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल

सचिन कदम, अलिबाग

Alibaug ZP Election Win Eknath Shinde Shivsena Sachin Raul Attack News राज्यात ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल काल म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. या निवडणुकीचा निकाल देखील महायुतीच्या बाजूने जास्त मतांनी लागला. कोणाचा विजय झाला तर कोणाला हार पत्करावी लागली. या निवडणुकांच्या निकालानंतर अलिबागमध्ये विजयी उमेदवाराच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासह १० ते १२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथील शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार सचिन राऊळ यांच्या विजयानंतर कार्यकर्ते या गाडीतून देवदर्शनासाठी जात होते. या प्रवासादरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली. आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. गाडीच्या काचा फोडल्या आणि कार्यकर्त्यांना देखील क्रूरपणे मारहाण केली.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Shocking : अर्धनग्न असताना रूमचा दरवाजा उघडला, प्रसिद्ध हॉटेलमध्ये स्पा थेरपी सुरू असताना परदेशी महिलेसोबत भयंकर घडलं

याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह 10 ते 12 जणांविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com