बेंगळुरूमधील हॉटेल स्पा सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार
परदेशी महिलेवर मसाज थेरपिस्टकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप
हॉटेल व्यवस्थापनाने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा दावा
पीडित महिलेची पोलिसांत तक्रार, तपास सुरू
कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका परदेशी महिलेवर प्रसिद्ध हॉटेलमधील मसाज थेरपिस्टने लैंगिक अत्याचार केले आहे. धक्कादायक म्हणजे मसाज थेरीपेस्टने महिला अर्धनग्न असताना तिच्या रूमचा दरवाजा उघडून आत शिरल्याचा आरोप आहे. विधान सौधा पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या हॉटेलमध्ये मसाज सत्रादरम्यान ही घटना घडल्याचे वृत्त आहे. मसाजदरम्यान थेरपिस्टने तिच्यावर हल्ला केल्याचा तिचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिस सविस्तर तपास करत आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, कॅनडा मधील एक महिलेने कर्नाटकातील फिरण्यासाठी आली होती दरम्यान येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ती वास्तव्यास होती. तिने या हॉटेलच्या स्पा सेंटरमध्ये स्लॉट बुक केला होता. त्यासाठी तिने १०००० रुपये दिले होते. मात्र या स्पा थेरपिस्टने महिलेसोबत धक्कादायक प्रकार केला.
महिला अर्धनग्न असताना स्पा थेरपिस्टने तिच्या रूमचे दार उघडून आत डोकावून पहिले. शिवाय मसाज दरम्यान थेरपिस्टने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर महिलेने हॉटेल चालकाला तक्रार केली असता हॉटेल चालकाने बदनामी होऊ नये यासाठी महिलेला तिने दिलेल्या १० हजारांपैकी ७ हजार परत केले.
शिवाय याबद्दल महिलेला कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीत तिने हॉटेल कर्मचारी आणि व्यवस्थापनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.