Success Story : असंख्य स्वप्नांची पूर्तता, शेतकऱ्याच्या लेकीच्या यशाने सोलापुरात आनंदोत्सव, वाचा डॉ. गौरी झोळ यांचा संघर्षमय प्रवास

Success Story Of Solapur Dr. Gauri zol : शेतकरी कुटुंबातून एमडी डर्मेटोलॉजीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. डॉ. गौरी झोळ यांची संघर्ष, कष्ट आणि शिक्षणावर श्रद्धा असलेली यशकथा
Success Story : असंख्य स्वप्नांची पूर्तता, शेतकऱ्याच्या लेकीच्या यशाने सोलापुरात आनंदोत्सव,  वाचा डॉ. गौरी झोळ यांचा संघर्षमय प्रवास
Success Story Of Solapur Dr. Gauri zolSaam TV
Published On
Summary
  • शेतकरी कुटुंबातील डॉ. गौरी अनुरथ यांचा आदर्श वैद्यकीय प्रवास

  • ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी आदर्श ठरणारी वाटचाल

  • आई-वडिलांच्या त्याग, पाठिंबा आणि विश्वासाचे फळ

  • शिक्षणाचा उपयोग समाजातील गरजू रुग्णांसाठी करण्याचा निर्धार

  • संघर्षातून घडलेली संवेदनशील आणि जबाबदार डॉक्टर

काही यशकथा केवळ पदवी मिळवण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या माणसांच्या कष्टांना अर्थ देतात, संघर्षाला प्रतिष्ठा देतात आणि स्वप्नांना पंख देतात. डॉ. गौरी अनुरथ झोळ यांचा वैद्यकीय प्रवास अशीच मनाला खोलवर स्पर्शून जाणारी कहाणी आहे. कष्ट आणि प्रचंड स्पर्धात्मक असलेल्या एम डी डर्मेटोलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची झालेली निवड ही केवळ वैयक्तिक यशाची नव्हे, तर शेतकरी कुटुंबाच्या न बोलता जपलेल्या असंख्य स्वप्नांची पूर्तता आहे.

वाशिंबे (ता. करमाळा, जि. सोलापूर) हे डॉ. गौरी यांचे मूळ गाव. त्यांच्या या यशामुळे गावात आनंद, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण पसरले आहे. मातीशी नातं जपणाऱ्या घरात जन्मलेली गौरी लहानपणापासूनच कष्ट, शिस्त आणि संयम या मूल्यांत वाढली. घरात लाभलेलं अभ्यासपूर्ण वातावरण, पुस्तकांशी जुळलेली मैत्री, वेळेचं काटेकोर नियोजन आणि साधी पण शिस्तबद्ध जीवनशैली, या सगळ्यांनी तिच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली. अभ्यासासोबतच समाजाविषयीची जाणीव आणि माणुसकीची जबाबदारी तिच्या मनात हळूहळू रुजत गेली.

Success Story : असंख्य स्वप्नांची पूर्तता, शेतकऱ्याच्या लेकीच्या यशाने सोलापुरात आनंदोत्सव,  वाचा डॉ. गौरी झोळ यांचा संघर्षमय प्रवास
Pune Crime News : पहिल्या मजल्यावर फ्लॅटमध्ये सुरू होता भयंकर प्रकार; धाड टाकल्यानंतर रूममधलं दृश्य बघून सगळेच हादरले

केवळ परीक्षा जिंकणारे नव्हे, तर समाजासाठी उपयुक्त ठरणारे संवेदनशील डॉक्टर घडवण्याची शिकवण तिच्या संपूर्ण वाटचालीत ठळकपणे दिसून येते. आत्मविश्वास, सातत्य आणि मूल्याधिष्ठित जीवन यांचा खरा अर्थ तिने अनुभवातून समजून घेतला.

Success Story : असंख्य स्वप्नांची पूर्तता, शेतकऱ्याच्या लेकीच्या यशाने सोलापुरात आनंदोत्सव,  वाचा डॉ. गौरी झोळ यांचा संघर्षमय प्रवास
मुंबई लोकलमध्ये पुन्हा राडा! दोघांच्या भांडणात तिसऱ्याने गमावला डोळा; नेमकं काय घडलं?

डॉ. गौरी अनुरथ झोळ यांचे शालेय शिक्षण शारदानगर, बारामती येथे झाले. त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथून त्यांनी ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले, तर डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, मुंबई येथून वैद्यकीय शिक्षण घेतले. हा प्रवास केवळ शैक्षणिक नव्हता, तर तो संयम, चिकाटी आणि स्वप्नांवरील अढळ निष्ठेचा होता.

Success Story : असंख्य स्वप्नांची पूर्तता, शेतकऱ्याच्या लेकीच्या यशाने सोलापुरात आनंदोत्सव,  वाचा डॉ. गौरी झोळ यांचा संघर्षमय प्रवास
Pune Crime News : पहिल्या मजल्यावर फ्लॅटमध्ये सुरू होता भयंकर प्रकार; धाड टाकल्यानंतर रूममधलं दृश्य बघून सगळेच हादरले

या यशामागे अनुरथ झोळ आणि लक्ष्मी झोळ या दोन शांत पण मजबूत आधारस्तंभांचा मोठा वाटा आहे. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलींच्या स्वप्नांना पाणी घातले. प्रत्येक अपयशात आधार दिला, तर प्रत्येक यशात डोळ्यांत न उमटलेलं समाधान साठवून ठेवलं. गौरी झोळ ही केवळ एक डॉक्टर नाही, तर ती आई-वडिलांच्या संघर्षाची साक्ष आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून येऊनही मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस तिने केलं, कारण तिच्या पाठीशी कष्टकरी पालकांची न बोलता दिलेली, पण भक्कम साथ होती.

Success Story : असंख्य स्वप्नांची पूर्तता, शेतकऱ्याच्या लेकीच्या यशाने सोलापुरात आनंदोत्सव,  वाचा डॉ. गौरी झोळ यांचा संघर्षमय प्रवास
Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांना भरधाव कंटेनरने चिरडलं; ६ जणांचा मृत्यू, १ जखमी

अनुरथ झोळ यांची दुसरी मुलगी मानसी झोळ हिने बी बी ए इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे. आज डॉ. गौरी झोळ यांच्यावर शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र त्याहून महत्त्वाचं म्हणजे, त्यांची ही वाटचाल असंख्य विद्यार्थ्यांसाठी आशेचा दीप ठरत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी कष्ट, त्याग, योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणावरची श्रद्धा असेल, तर स्वप्नं नक्कीच प्रत्यक्षात उतरतात, हा मूक पण ठाम संदेश ही यशकथा देऊन जाते. या यशप्रसंगी डॉ. गौरी अनुरथ झोळ म्हणाल्या, “आज मी एम डी पदवीपर्यंत पोहोचले आहे, पण हे यश माझे एकटीचे नाही. हे माझ्या आई-वडिलांचे आहे. वडिलांनी माझ्या स्वप्नांना बळ दिलं, तर आईने घरात धीर धरून मला अभ्यासासाठी आधार दिला. त्यांच्या डोळ्यांत मी जे स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करणं हेच माझं खरं यश आहे.

Success Story : असंख्य स्वप्नांची पूर्तता, शेतकऱ्याच्या लेकीच्या यशाने सोलापुरात आनंदोत्सव,  वाचा डॉ. गौरी झोळ यांचा संघर्षमय प्रवास
Kalyan : ठाकरे गटाचे ‘बेपत्ता’ नगरसेवक शिंदेंसेनेच्या मंचावर, कुठे होते? विचारताच काढला पळ, कल्याणच्या राजकारणात नेमकं काय घडतेय?

आज डॉक्टर म्हणून समाजाप्रती माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. माझं शिक्षण केवळ माझ्यासाठी नाही, तर गरजू रुग्णांसाठी आहे. ग्रामीण भागातील, कष्टकरी कुटुंबातील प्रत्येक मुलीला मी एवढंच सांगू इच्छिते, परिस्थिती अडचणीची असली, तरी स्वप्न पाहणं थांबवू नका. मेहनत, श्रद्धा आणि संयम असतील, तर देवही वाट मोकळी करतो.” गौरी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com