मुंबई लोकलमध्ये पुन्हा राडा! दोघांच्या भांडणात तिसऱ्याने गमावला डोळा; नेमकं काय घडलं?

Mumbai Local Train Crime News : पश्चिम रेल्वेवर ट्रेनमधील दोघांच्या किरकोळ भांडणात दगडफेकीमुळे तिसऱ्या निष्पाप प्रवाशाची दृष्टी कायमची बाधित झाली. वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
मुंबई लोकलमध्ये पुन्हा राडा! दोघांच्या भांडणात तिसऱ्याने गमावला डोळा; नेमकं काय घडलं?
Mumbai Local Train Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई ट्रेनमधील भांडणात निष्पाप प्रवाशाचा गंभीर अपघात

  • दगडफेकीमुळे तरुणाची दृष्टी कायमची बाधित

  • लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला केली अटक

  • पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

संजय गडदे, मुंबई

मालाड रेल्वे स्थानकात एका प्राध्यापकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान दोन प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणात तिसऱ्याच तरुणाला आपला एक डोळा गमवावा लागला. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र या प्रकरणात वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी जलद कारवाई करत अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली आहे. योगेंद्र वंशराज बौद्ध असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अंधेरी–वांद्रे रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. पीडित तरुणाचे नाव निशांत रत्नाकुमार खत्री असे आहे. पीडित तरुण हा ट्रेनने आपल्या कामावरून घरी जात होता. दरम्यान, ट्रेनमध्ये आधीच उपस्थित असलेल्या दोन प्रवाशांमध्ये किरकोळ वाद सुरु होता. या वादातून एकाने दगड भिरकवला, मात्र तो ट्रेनवर आदळला. त्यानंतर दुसरा दगड भिरकावला असता तो निशांतच्या डोळ्यावर बसला. पीडित तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा होऊन दृष्टी कायमस्वरूपी बाधित झाली.

मुंबई लोकलमध्ये पुन्हा राडा! दोघांच्या भांडणात तिसऱ्याने गमावला डोळा; नेमकं काय घडलं?
Gujrat : होमवर्क केला नाही म्हणून शिक्षिका भडकली; विद्यार्थीनीच्या कानाखाली मारली अन्...; न्यालयाने सुनावली भयंकर शिक्षा

घटनेनंतर जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वांद्रे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली.

मुंबई लोकलमध्ये पुन्हा राडा! दोघांच्या भांडणात तिसऱ्याने गमावला डोळा; नेमकं काय घडलं?
Success Story : नोकरी सोडली, IIT कपलने लंडनमध्ये थाटला पाणीपुरीचा व्यवसाय; एका प्लेटची किंमत जाणून व्हाल थक्क

लोहमार्ग पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपीला अटक करून त्याच्याकडून चौकशी सुरू केली आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मालाड रेल्वे स्थानकातील प्राध्यापक हत्येनंतर सलग घडलेल्या या घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबई लोकलमध्ये पुन्हा राडा! दोघांच्या भांडणात तिसऱ्याने गमावला डोळा; नेमकं काय घडलं?
Today Weather News : राज्यात शेकोट्या विझल्या, उकाडा वाढला; किमान तापमान वाढीमुळे थंडी गायब; वाचा तुमच्या शहरात आजचे हवामान

मात्र या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुकही केले जात आहे. लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, संशयास्पद प्रकार, भांडणे किंवा गैरप्रकार तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणावेत, जेणेकरून वेळीच कारवाई करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com