Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांना भरधाव कंटेनरने चिरडलं; ६ जणांचा मृत्यू, १ जखमी

Uttar Pradesh Yamuna Expressway Accident News : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना एक्सप्रेसवेवर भरधाव कंटेनरने ७ जणांना चिरडले. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांना भरधाव कंटेनरने चिरडलं; ६ जणांचा मृत्यू, १ जखमी
Uttar Pradesh Yamuna Expressway Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • मथुरातील यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात

  • कंटेनरच्या धडकेत ६ प्रवाशांचा मृत्यू

  • एक प्रवासी गंभीर जखमी

  • मध्यरात्री २:४५ वाजता घटना

Uttar Pradesh Yamuna Expressway Mathura Accident Today उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मोठा अपघात झाला आहे. यमुना एक्सप्रेसवेवर एका भरधाव कंटेनरने ७ जणांना चिरडले. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १ जण गंभीर जखमी आहे. हा अपघात आज सकाळी घडला असून अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली असून जखमी रुग्णाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्री २:४५ च्या सुमारास प्रवाशांनी भरलेली बस दिल्लीतील नांगलोईहून कानपूरमधील रसूलाबादला जात होती. सुरीर पोलीस स्टेशन परिसरातील माईल स्टोन ८८ जवळ बसमधील प्रवासी बस थांबवून लघुशंकेसाठी उतरले. परंतु ग्रीन झोनमध्ये थांबण्याऐवजी वाटेतच चालकाने बस थांबवली.

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांना भरधाव कंटेनरने चिरडलं; ६ जणांचा मृत्यू, १ जखमी
Shocking : शिक्षिकेच्या प्रेमात विद्यार्थी झाला वेडापिसा, प्रपोज केला पण नकार दिला, रागात तिच्या ओठांवरून चाकू फिरवला अन्...

या दरम्यान लघुशंकेसाठी बसमधून उतरलेल्या प्रवाशांना मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने चिरडले. या भीषण धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुघटनेननंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनस्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांना भरधाव कंटेनरने चिरडलं; ६ जणांचा मृत्यू, १ जखमी
Crime news : बंद खोलीत ३८ महिला आणि ४३ पुरुष, पोलिसांची धाड पडली, धक्कादायक प्रकार उघड; ८१ जण सापडले कचाट्यात

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रस्ते अपघाताची दखल घेत दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात मृत झालेल्या प्रवाशांच्या शोकाकुल कुटुंबियांबद्दल त्यांनी तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही त्यांनी केली. मुख्यमंत्री योगी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने पोहोचून मदत आणि बचाव कार्याला गती देणे, तसेच खमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे आणि रुग्णालयात सर्व आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com