धुळ्यात शिर्डी पदयात्रेतील भाविकांना ट्रकची धडक
दोन भाविक गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
रस्त्यातील खड्ड्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले
अपघातानंतर परिसरात भीती व बघ्यांची गर्दी
भूषण अहिरे, धुळे
धुळ्यात भीषण अपघात झाला आहे. शिर्डीकडे पायी जाणाऱ्या भाविकांना ट्रक चालकाने धडक दिली आहे. या धडकेत दोन भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ट्रकवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात कडून शिर्डी कडे जवळपास 140 भाविक हे पदयात्रेच्या माध्यमातून पिंपळनेर-दहिवेल रस्त्यावरून पायी चालत जात होते. रस्त्यात अचानक खड्डा आल्याने ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि पायी चालणाऱ्या भाविकांना या ट्रकने चिरडले. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
स्थानिकांच्या मदतीने तात्काळ या जखमी भाविकांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान या घटनेनंतर भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडाली. या अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.