Badlapur : महिला पत्रकारावर हल्ला, बदलापूरमधील घटनेने खळबळ; भरदिवसा कार अडवली, काचा फोडल्या

Badlapur News : सोशल मीडिया पत्रकार श्रद्धा ठोंबरे हीच्यावर पोलीस स्टेशनबाहेर हल्ला करण्यात आला असून तिच्या गाडीची तोडफोड झाली आहे. भाजप नगरसेवक प्रवीण राऊत समर्थकांवर हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Badlapur : महिला पत्रकारावर हल्ला, बदलापूरमधील घटनेने खळबळ;  भरदिवसा कार अडवली, काचा फोडल्या
Badlapur NewsSaam Tv
Published On
Summary
  • पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर हल्ला

  • पोलीस स्टेशनबाहेर गाडीची तोडफोड

  • प्रवीण राऊत समर्थकांवर आरोप

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू

मयुरेश कडव, बदलापूर

सोशल मीडिया पत्रकार श्रद्धा ठोंबरेवर हल्ला झालाय. तिच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. महत्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनबाहेरच हा प्रकार घडलाय. भाजपचे स्विकृत नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या सांगण्यावरून त्यांच्या महिला कार्यकत्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप श्रद्धा ठोंबरेने केलाय. श्रद्धा ठोंबरेने एका निनावी पत्रावरून काल सोशल मीडियात लाईव्ह केलं होतं. त्याचा राग मनात धरून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप श्रद्धा ठोंबरेने केलाय.

काल सोशल मीडियात एक निनावी पत्र व्हायरल झालं. या निनावी पत्रात भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रवीण राऊत यांना भाजपात घेण्यामागची नेमकी रणनीती काय आहे? त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य कसे निवडून आले याबद्दल लिहिण्यात आलं होतं. त्याच पत्राला अनुसरून श्रद्धा ठोंबरेने सोशल मीडियातून लाईव्ह केलं होतं. त्यानंतर प्रवीण राऊत समर्थक आक्रमक झाले.

Badlapur : महिला पत्रकारावर हल्ला, बदलापूरमधील घटनेने खळबळ;  भरदिवसा कार अडवली, काचा फोडल्या
Accident : मुंबईतील कार्गो परिसरात भयंकर अपघात, गणेशला ट्रकने उडवले, कामगार हादरले

प्रवीण राऊत यांची बदनामी केल्याचा आरोप करत राऊत समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर गोंधळ घातला होता. श्रद्धा ठोंबरेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी बाराच्या सुमारास श्रद्धा ठोंबरे पालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी नगरपालिकेत गेली होती. त्यावेळीही काही राऊत समर्थकांनी आक्रमक होत बातमीचा जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर श्रद्धा ठोंबरेने डीसीपीना फोन करत झालेल्या प्रकार त्यांच्या कानावर घातला.

Badlapur : महिला पत्रकारावर हल्ला, बदलापूरमधील घटनेने खळबळ;  भरदिवसा कार अडवली, काचा फोडल्या
Akola : एका लग्नाची अजब गोष्ट! सोशल मीडियावर जुळल्या रेशीमगाठी, साडेतीन फूट नवरदेव आणि तीन फूट नवरीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

डीसीपींनी तिला पोलीस स्टेशनला जाण्याची सूचना केली. श्रद्धा ठोंबरे आपल्या कॅमेरामॅन सोबत पोलीस स्टेशनला पोहोचताच त्याठिकाणी काही महिला कार्यकर्त्यांनी तिच्या गाडीभोवती गरडा घालत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. इतकच नाही तर जमावाने तिच्या गाडीची तोडफोडही केली. आपल्यावरील हल्ला हा प्रवीण राऊत यांच्या सांगण्यावरूनच त्यांच्या समर्थकांनी केला असल्याचा आरोप श्रद्धा ठोंबरेने केलाय. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी तिने केलीय. पोलिसांनी दोन्ही बाजू कडचा जबाब नोंदवला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com