Shocking : वॉर्ड बॉय बनला डॉक्टर; तरुणीला चुकीचे इंजेक्शन दिले अन् भयंकर घडलं!

Navi Mumbai Vashi Crime News : नवी मुंबईतील धक्कादायक घटना! वॉर्डबॉयने बनावट डॉक्टर बनून एका आजारग्रस्त तरुणीवर उपचार केले. वॉर्डबॉयने दिलेल्या इंजेक्शनमुळे तरुणीचा मृत्यू झाला.
Navi Mumbai Vashi Crime News
Navi Mumbai Vashi Crime News Saam Tv
Published On
Summary
  • नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार

  • वॉर्डबॉयने डॉक्टर असल्याचं भासवून उपचार केले

  • इंजेक्शनच्या दुष्परिणामांमुळे तरुणीचा मृत्यू

  • आरोपी मानखुर्द परिसरात डॉक्टर म्हणून परिचित

  • वॉर्डबॉयला अटक

झी मराठी या वाहिनीवरील सुरु असलेल्या देव माणूस या मालिकेतील कथेसारखी एक घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात घडली आहे. एका नर्सिंग होममध्ये काम करणारा वॉर्डबॉय स्वयंघोषित डॉक्टर बनून लोकांवर इलाज करत होता. मात्र त्याचं हे गुपित एका धक्कादायक घटनेने उघडकीस आलं आहे. त्याच्या बहुरुपीय फसव्या खेळाने तरुणीचा जीव गेला आहे. याप्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव प्रचिती भुवड असून संदेश पाष्टे (३०) असे आरोपीचे नाव आहे. तरुणीच्या वडिलांनी संदेशला तिच्या हॉर्मोनल आजारावर उपचार करण्यासाठी घरी बोलावले होते. खासगी नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणारा पाष्टे डॉक्टर म्हणून अनेकांवर उपचार करत होता.

Navi Mumbai Vashi Crime News
Pune : ६ गुन्हे, अनेक गाड्या चोरी, पण शेवट असा! पुणे पोलिसांनी रचला सापळा अन् चोरांच्या मुसक्या आवळल्या

प्रचितीच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकाच्या ओळखीतून मुलीच्या उपचारासाठी पाष्टेला घरी बोलावलं. त्यानुसार त्याने तरुणीची घरी येऊन तपासणी केली आणि आजारावर उपचार म्हणून तात्पुरते एक इंजेक्शन दिले. मात्र, इंजेक्शनच्या दुष्परिणामुळे तिचा त्रास वाढला. त्यामुळे त्याने तिला पुन्हा एक इंजेक्शन दिले. त्याने तिची प्रकृती आणखी खालावली आणि मृत्यू झाला.

Navi Mumbai Vashi Crime News
Walmik Karad : वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ, महत्वाचे पुरावे सादर; कोर्टात नेमकं काय झालं?

याप्रकरणी प्रचितीच्या वडिलांनी बोगस डॉक्टरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासात संदेश पाष्टे हा अंधेरीतील सिद्धी नर्सिंग होममध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. धक्कादायक म्हणजे संदेश राहत असलेल्या मानखुर्द परिसरात तो डॉक्टर म्हणून परिचित आहे. त्याने अनेकांवर उपचार केल्याचेही उघड झाले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com