Pune : ६ गुन्हे, अनेक गाड्या चोरी, पण शेवट असा! पुणे पोलिसांनी रचला सापळा अन् चोरांच्या मुसक्या आवळल्या

Pune Pimpari Chinchwad News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ५.५ लाख रुपयांच्या १३ दुचाकी जप्त केल्या असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Pune : ६ गुन्हे, अनेक गाड्या चोरी, पण शेवट असा! पुणे पोलिसांनी रचला सापळा अन् चोरांच्या मुसक्या आवळल्या
Pune Pimpari Chinchwad NewsSaam Tv
Published On
Summary
  • वाहनचोर टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

  • १३ दुचाकी जप्त, किंमत ५.५ लाख रुपये

  • चाकण एमआयडीसी परिसरातून चोरी

  • सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून आरोपी अटकेत

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वाहन चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५,५०,००० रुपये किमतीच्या एकूण १३ मोटारसायकली हस्तगत केल्या असून दोन आरोपींना अटक केली आहे.

औद्योगिक परिसरात सातत्याने होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने, महाळुंगे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार शुभम खंडागळे यांना आरोपी आंबेठाण चौक चाकण येथे असल्याची माहिती मिळाली.

Pune : ६ गुन्हे, अनेक गाड्या चोरी, पण शेवट असा! पुणे पोलिसांनी रचला सापळा अन् चोरांच्या मुसक्या आवळल्या
Pune : 'मी महाराष्ट्र सोडून जाईन...', फेसबुक लाईव्ह करत परप्रांतीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर, Video व्हायरल

पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली आहे .निलेश राजु मंडलीक, संदिप साहेबराव सोनवणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी चाकण एमआयडीसी व आसपासच्या परिसरातून गाड्या चोरून त्यांची विक्री केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १३ गाड्या जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये स्प्लेंडर, पल्सर आणि पॅशन प्रो या गाड्यांचा समावेश आहे.

Pune : ६ गुन्हे, अनेक गाड्या चोरी, पण शेवट असा! पुणे पोलिसांनी रचला सापळा अन् चोरांच्या मुसक्या आवळल्या
Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांना भरधाव कंटेनरने चिरडलं; ६ जणांचा मृत्यू, १ जखमी

हे गुन्हे उत्तर महाळुंगे, दक्षिण महाळुंगे, शिक्रापूर, करमाळा, चतु:श्रृंगी आणि चाकण पोलीस ठाण्यांतर्गत नोंदवण्यात आले होते. ही धडाकेबाज कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सपोनि कल्याण घाडगे आणि त्यांच्या पथकाने पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com