Badlapur: बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, १० लाखांचा औषधसाठा जप्त; अनेक बडे मासे गळाला लागणार?

Badlapur Ovary Trafficking Case: बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात फक्त बदलापूर नाही तर मुंबई, ठाणे परिसरातील अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असल्याची शक्यता आहे.
Badlapur: बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, १० लाखांचा औषधसाठा जप्त; अनेक बडे मासे गळाला लागणार?
Badlapur Ovary Trafficking CaseSaam Tv
Published On

Summary -

  • बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

  • १० लाखांपेक्षा जास्त किमतीचा औषधसाठा जप्त

  • मुंबई-ठाण्यातील काही डॉक्टर आणि आयव्हीएफ सेंटर संशयाच्या भोवऱ्यात

  • या रॅकेटमध्ये ३०० हून अधिक महिला पीडित असल्याची माहिती

  • अनेक बड्या डॉक्टरांचा या रॅकेटमध्ये सहभाग असण्याची शक्यता

मयुरेश कडव, बदलापूर

बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अनेक बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. अंडाशयाच्या रॅकेटमध्ये फक्त बदलापूरच नाही तर मुंबई, ठाणे परिसरातील अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या तीन पथकाकडून ठाणे, वांगणी, विठ्ठलवाडी तसंच बदलापूरमध्ये छापे टाकत झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल १० लाखांपेक्षा जास्त किंमतीचा औषधांचा साठा जप्त केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात पोलिसांकडून धडक कारवाई सुरू आहे. पोलिसांनी ठाणे, बदलापूर, विठ्ठलवाडी, वांगणी परिसरात छापे टाकले. तर ठाण्यातील काही आयव्हीएफ सेंटरवर देखील पोलिसांनी छापे टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. १० लाखांहून अधिक किंमतीचा औषधसाठा या कारवाईमध्ये पोलिसांनी जप्त केला. आता ही औषधं नेमकी कशासाठी वापरली जात होती? या रॅकेटमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Badlapur: बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, १० लाखांचा औषधसाठा जप्त; अनेक बडे मासे गळाला लागणार?
Badlapur: ३०० पीडित महिला, एका अंडाशयामागे २० हजार रुपये; बदलापूर तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकरसह ३ महिलांना अटक केली आहे. सुलक्षणा गाडेकरच्या घरावर देखील पोलिसांनी छापा टाकत अनेक संशयास्पद इंजेक्शन जप्त केली आहेत. ती गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्या अंडाशयाची तस्करी करायची. या प्रकरणामध्ये ३०० पेक्षा अधिक पीडित महिला आहे. या महिलांना अंडाशयामागे २०००० रुपये दिले जात होते. तर यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलांना प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात येत होते. या अंडाशयांची केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती.

Badlapur: बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, १० लाखांचा औषधसाठा जप्त; अनेक बडे मासे गळाला लागणार?
Badlapur : बदलापूरमध्ये महिलांच्या अंडाशयांची तस्करी, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; ३ महिलांना अटक

या प्रकरणातील सूत्रधार सुलक्षणा गाडेकर ही बदलापुरामध्ये राहते. तिच्या घरातून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. ती महिलांना घरी बोलावून त्यांना इंजेक्शन द्यायची. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे त्यांची सोनोग्राफी करून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर या महिलांना ती आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढून घेतले जायचे. त्यानंतर त्याची इतर राज्यात नेऊन विक्री केली जात होती.

Badlapur: बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, १० लाखांचा औषधसाठा जप्त; अनेक बडे मासे गळाला लागणार?
Badlapur : महिला पत्रकारावर हल्ला, बदलापूरमधील घटनेने खळबळ; भरदिवसा कार अडवली, काचा फोडल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com