Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती बिघडली, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यात

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली. बारामतीवरून त्यांना उपचारासाठी पुण्यात आणले जाणार आहे. रूबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले जाणार आहे.
Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती बिघडली, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवलं
Sharad Pawar Saam tv
Published On

Summary -

  • शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली

  • ताप, कफ आणि खोकल्याचा त्रास वाढला

  • बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी डॉक्टरांची टीम दाखल

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात येणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले जाणार आहे. शरद पवार सध्या बारामतीमध्ये आहेत. आता त्यांना उपचारासाठी बारामतीवरून पुण्यात आणले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना ताप, खोकला आणि कफ झाला आहे. आज सकाळपासून त्यांना जास्त त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुबी हॉल क्लिनकला हलवण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज त्यांच्या तेराव्याचा विधी बारामतीत होत आहे. या विधीसाठी शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत आहेत. पण आज सकाळपासूनच शरद पवार यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे डॉक्टरांची टीम बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी आली होती. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. पण शरद पवार यांना जास्त त्रास होऊ लागल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आता त्यांना पुण्यात उपचारासाठी आणले जाणार आहे.

Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती बिघडली, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवलं
Sharad Pawar: त्याचे परिणाम आम्ही महाराष्ट्रात भोगलेय... बिहार निकालावर शरद पवार असे का म्हणाले? VIDEO

रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाईल. आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना अॅडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ.'

Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती बिघडली, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना सोलापूरमध्ये पुन्हा धक्का, कोठेंसह दिग्गजांनी हातात घेतलं कमळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com