Sharad Pawar : शरद पवारांना सोलापूरमध्ये पुन्हा धक्का, कोठेंसह दिग्गजांनी हातात घेतलं कमळ

Sharad Pawar Solapur setback news : सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर महेश कोठे गटासह अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक निवडणुकांपूर्वी ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSaam Tv
Published On
Summary
  • सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

  • माजी महापौर महेश कोठे यांच्या गटाने भाजपमध्ये प्रवेश केला.

  • पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते.

  • आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोडी महत्त्वाची मानली जातेय.

Solapur local election political shifts : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिहुल वाजले असतानाच सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला भाजपाने मोठा धक्का दिलाय. सोलापूरच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील मुख्य गट दिवंगत माजी महापौर महेश कोठे गटाने भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पार पडला प्रवेश सोहळा पार पडला. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे वडील दिवंगत महेश कोठे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे भापमध्ये पुन्हा जुने विरुद्ध नवे असा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र आगामी महानगरपलिका निवडणूकीच्या अनुषंगाने कोठे परिवार एकत्र आल्याने सोलापुरात जोरदार चर्चा  सुरू आहे.

Sharad Pawar
PMC Elections : पुण्यात अनेक दिग्गजांना धक्का, PMC निवडणुकीचे आरक्षण जाहीर, वाचा कोणता प्रभाग कुणाला राखीव

माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, माजी नगरसेविका मीरा गुर्रम, जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाकसे, राष्ट्रवादी युवकचे शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार, परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे, संतोष सोमा, वासु यलदंडी, दिनेश गुर्रम, आकाश भोसले आदींचा भाजपा प्रवेश संपन्न झाला.

Sharad Pawar
BMC elections : मोठी बातमी! मुंबईसाठी आरक्षण सोडत जाहीर, ठाकरेंना जोरदार धक्का, पाहा कोणता वॉर्ड कशासाठी राखीव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री जयकुमार गोरे व थोरले बंधू आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आजोबा स्व विष्णुपंत तात्या कोठे व माझे वडील स्व. महेश अण्णा कोठे यांचे सामाजिक व राजकीय कार्य अधिक जोमाने पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहीन. आमचा कोठे परिवार राजकारणात सुद्धा पुन्हा एकत्र आल्याचा आनंद आहे, असे प्रथमेश कोठे म्हणाले.

Sharad Pawar
Delhi Car Blast : गुजरातमध्ये विष, हरियाणात RDX अन् दिल्लीत स्फोट, डॉक्टरच्या आडून कोण डाव साधतेय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com