मयुरेश कडव, बदलापूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Badlapur 10-year-old girl harassment case update :बदलापूर पुन्हा एकदा हादरलेय. १० वर्षाच्या मुलीचा भररस्त्यात विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकऱणी पोलिसांनी अंबरनाथच्या रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. १० वर्षाची मुलगी ट्युशनला जात होती, त्यावेळी आरोपीने तिचा रस्त्यात विनयभंग केला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या. पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.
बदलापूरमध्ये याआधी मुलीवर अन् शाळकरी पोरावर अत्याचार केल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे बदलापूरमध्ये आधीच संतापाचे वातावरण आहेत. त्यातच आता १० वर्षाच्या मुलीवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्यामुळे आगीत तेल पडलेय. ट्युशनला जाणाऱ्या १० वर्षाच्या मुलीचा भररस्त्यात विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला. पीडित मुलीच्या कुटुंबिंच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापुरात ट्युशनला जाणाऱ्या एका 10 वर्षीय मुलीचा भररस्त्यात विनयभंग केल्याप्रकरणी एका रिक्षाचालकाला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा रिक्षाचालक अंबरनाथमध्ये राहणारा असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी घडल्याचे समोर आले आहे. मुलीला रस्त्यात थांबवून आरोपीने विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटलेयय. या घटनेची माहिती मिळताच बदलापूरकरांनी संताप व्यक्त केला आहे.
6 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी ट्युशनला जात असताना एका रिक्षाचालकाने तिला रस्त्यात थांबवून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करताना अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. हा रिक्षाचालक अंबरनाथमध्ये राहणारा होता. पोलिसांनी त्याला काही तासातच बेड्या ठोकल्या. यानंतर न्यायालयानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय. या प्रकारामुळे बदलापुरात पोक्सो गुन्हे थांबत नसल्याचं चित्र निर्माण झालंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.