Accident : मध्यरात्री हायवेवर मृत्यूचं तांडव, लग्नाहून आलेली कार आधी डिव्हायडरला धडकली मग....; ६ जणांचा मृत्यू

Jaipur Agra highway latest accident news : राजस्थानातील जयपूर-आग्रा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. कारने आधी डिव्हायडरला धडक दिल्यानंतर ट्रेलरला जोरदार धडक दिल्याने कारचा चुराडा झाला. सिकंदरा पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Jaipur Agra highway latest accident news
Jaipur Agra highway latest accident newsSaam TV Marathi News
Published On

Jaipur Agra highway latest accident news : राजस्थानमधील जपयूर आग्रा महामार्गावर एका कारचा मध्यरात्री भयंकर अपघात झाला. सिकंदरामधील (Sikandra police accident report) कैलाई गावाजवळ कारने आधी डिव्हायडरवर जोरात आदळली, त्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या ट्रेलरला जोरात धडक दिली. (Rajasthan road accident today)

कारच्या या भयानक अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांचा रूग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी (Traffic jam after highway accident) झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (Jaipur Agra highway midnight accident six dead details)

Jaipur Agra highway latest accident news
धक्कादायक! हायस्कूलमध्ये अंदाधुंद गोळीबार, १० जणांचा मृत्यूने कॅनडा हादरले, हल्लेखोराचा जागेवरच खात्मा

अपघाताची माहिती मिळताच सिकंदरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. त्यांनी अपघातामधील जखमींना तात्काळ रूग्णालयात हलवले, पण दोन जणांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये कारमधील ६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

येथील सिकंदरा पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून ६ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. हा अपघात इतका भयंकर होता की धडक झाल्याचा आवाज कैलाई गावात गेला होता. गावकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले अन् पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती.

Jaipur Agra highway latest accident news
Pune : बायकोला गुजरातला आणायला जाणार होता, पण त्याआधीच फोनवर वाजलं! पुण्यात २३ वर्षाच्या पतीची आत्महत्या

राजस्थानमधील कलाखो गावातील ६ तरूण कारमधून प्रवास करत होते. ते लग्नानंतर घराकडे परत येत होते. पण त्याचवेळी काळाने घाला घातला. त्यांची कार अतिशय वेगात होती. त्याचवेळी अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन् गाडी बाजूच्या डिव्हायडरला जोरात धडक झाली. कारचा वेग इतका होता की डिव्हायडरला धडकल्यानंतर महामार्गावरून दुसऱ्या लेनने जाणाऱ्या ट्रेलरला जोरात धडक दिली.

या धडकेमुळे कारचा पूर्ण चुराडा झाला. यामध्ये चौघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर उपचारासाठी नेत असताना २ जणांनी प्राण सोडले. गोवर्धन योगी, बनवारी लाल योगी, हरिमोहन योगी, लालराम बैरवा आणि रामसिंह योगी यांचा अपघातात मृत्यू झाला. सर्व मृतदहे वेगवेगळ्या रूग्णलायत पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

Jaipur Agra highway latest accident news
३२-३२ मते... ईश्वरचिठ्ठी ठाकरेसेनेच्या पारड्यात, प्रशांत दानव झाले उपमहापौर
Jaipur Agra highway latest accident news
पुण्यात खळबळ! १५ वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला जन्म, स्वतःच कापली नाळ; खिडकीत नवजात बाळ अन् घरात जिकडे तिकडे रक्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com