३२-३२ मते... ईश्वरचिठ्ठी ठाकरेसेनेच्या पारड्यात, प्रशांत दानव झाले उपमहापौर

Municipal corporation deputy mayor election : उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी आणि भाजप युती उमेदवारांना समान ३२-३२ मते मिळाल्याने निकालाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आता पीठासन अधिकारी चिठ्ठीद्वारे अंतिम निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

What happens if deputy mayor election ends in tie votes chandrapur : चंद्रपूर महापालिकेच्या उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सत्ताधारी भाजप सेना युतीकडून अपक्ष उमेदवार प्रशांत दानव आणि काँग्रेस आघाडीचे पप्पू देशमुख यांच्यात लढत झाली. महापौरपद केवळ एका मताने गमावल्यानंतर आता उपमहापौर पदाची निवडणूक कशी होते, MIM सदस्य यात सहभागी होतो का नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पण उपमहापौरपदासाठी दोन्ही उमेदवारांनी सारखीच मते मिळाली.

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे पप्पू देशमुख आणि भाजप युती उमेदवार प्रशांत दानव यांना समान म्हणजे 32 - 32 मते मिळाली. त्यामुळे आता पीठासन अधिकारी ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेतला. ठाकरे सेनेचे प्रशांत दानव ईश्वर चिठ्ठीद्वारे उपमहापौरपदी निवड झाली.

चंद्रपूरच्या विकासासाठी काम करणार

चंद्रपूरच्या विकासासाठी शिवसेनेसोबत युती केली. चंद्रपूरच्या विकासाचा आराखडा मी तयार करून असून विकसित चंद्रपूरसाठी आम्ही काम करणार, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com