Pune : बायकोला गुजरातला आणायला जाणार होता, पण त्याआधीच फोनवर वाजलं! पुण्यात २३ वर्षाच्या पतीची आत्महत्या

Wife Dsipute Husband Suicide : फोनवर पत्नीशी झालेल्या वादातून २३ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे.
Pune
Pune
Published On

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Pimpri - Chinchwad, Pune Crime Latest News : पुण्यातील चिखली परिसरात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. फोनवर बोलताना गुजरातमध्ये असणाऱ्या पत्नीसोबत वाद झाल्यामुळे निराश झालेल्या नवऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रतिक संदीप घनवटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. फोनवर बोलत असताना प्रतिक याचा पत्नीसोबत जोरात वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात २३ वर्षीय प्रतिक (Pimpri Chinchwad 23 year old husband suicide case details) याने विषारी औषध प्राशन करून आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना चिखली पोलीस स्टेशन येथे घडली आहे. (Phone argument with wife leads to suicide in Pune

  1. )

Pune
पुण्यात खळबळ! १५ वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला जन्म, स्वतःच कापली नाळ; खिडकीत नवजात बाळ अन् घरात जिकडे तिकडे रक्त

प्रतिक संदीप घनवटे (वय २३, रा. चिखली) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या पतीचे नाव आहे. चिखली पोलीस ठाण्‍यातील वरिष्‍ठ निरीक्षक विठ्‌ठल साळुंके यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, प्रतिक यांची पत्‍नी गुजरात येथे होती. त्‍यांची नेहमीच भांडणे होत असे. तो आपल्‍या पत्‍नीला आणण्‍यासाठी गुजरातला जाणार होता. मात्र त्यापूर्वीच पत्‍नीशी त्‍याचा वाद झाला. त्‍यानंतर ६ फेब्रुवारी रोजी पतीने विषारी औषध प्राशन केले. त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री त्‍यांचा मृत्‍यू झाला. पत्‍नीशी होत असलेल्‍या सततच्‍या वादातून आपल्‍या मुलाने विषारी औषध प्‍यायल्‍याचे त्‍यांच्‍या आईने पोलिसांना सांगितले. मात्र आत्‍महत्‍येचे नेमके कारण समजू शकले नाही. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Pune
Mumbai : लग्नाच्या २० वर्षांनंतर लक्ष्यचा जन्म, पण पालकांसमोरच नियतीने घात केला, कारखाली चिरडल्याने एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

"पत्नीशी सतत होणाऱ्या वादाला कंटाळून मुलाने हे पाऊल उचलले," असा प्राथमिक जबाब प्रतिकच्या आईने पोलिसांना दिला आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके आणि ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी प्रतिक याच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. प्रतिक याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून प्रतिक याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तो मोबाइल फॉरेन्सिक टीमकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. रिपोर्ट्स आल्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे.

Pune
Mumbai fire : घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची वर्दळ... आणि अचानक सर्वकाही संपलं; लेकाच्या लग्नापूर्वीच आईचा दुर्दैवी अंत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com