Mumbai fire : घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची वर्दळ... आणि अचानक सर्वकाही संपलं; लेकाच्या लग्नापूर्वीच आईचा दुर्दैवी अंत

Mumbai fire accident News : मुंबईतील विले पार्ले येथे लेकाच्या लग्नाआधीच घराला भीषण आग लागली. या आगीत आईचा मृत्यू झाला असून सजावटीच्या दिव्यांमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Mumbai Fire
Mumbai FireSaam TV News (संग्रहित छायाचित्र)
Published On

wedding celebrations turned tragic due to house fire in Mumbai : घरात लेकाच्या लग्नाची लगबग सुरू होती. पाहुण्यांची वर्दळ सुरूच होती. आज लग्नाची मिरवणूक निघणार होती. पण त्याआधीच सोमवारी काळाने घात केला. घराला अचानक आग लागली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. मुलाच्या आईचा या आगीत मृत्यू झालाय. मुंबईतील विले पार्लेमध्ये घडली. येथील प्रसिद्ध बिल्डर सत्रा यांच्या घरात शोककळा पसरली आहे.

घरात लग्न असल्याने सत्रा कुटुंबाने बिल्डिंग सजलवली होती. भव्य उत्सव होता. घर दिव्यांनी सजवले होते. पण याच रोषणाईने क्षणात सर्व संपवले. घराचा पडदा वाऱ्याने उडाला अन् दिव्याजवळ गेला. पडद्याने क्षणात पेट घेतला.. पाहता पाहता ही आग सगळ्या अपार्टमेंटमध्ये पसरली. मुलाच्या लग्नाआधीच आईचा मृत्यू त्या आगीत झाला. आणखी एका नाताईकाला या आगीत गंभीर जखम झाली. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai Fire
ZP Election Result : राज्याच्या मंत्र्यांना जोरदार धक्का, हुकमी एक्क्याचा जिल्हा परिषदेत पराभव

सोमवारी सकाळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जीतू सत्रा यांच्या इमारतीत भीषण आग लागली. सत्रा कुटुंबातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि आणखी एक महिला जखमी झाली. या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. आगीमुळे क्षणात सर्व होत्याचे नव्हते. अग्निशमन दलाने ३ तासात आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत वेळ गेला होता.

Mumbai Fire
शरद पवारांची तब्येत आता कशी आहे? सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनीही घेतली भेट

पोलिसांनी सांगितले की, क्षणात आग संपूर्ण घरात पसरली. त्यामुळे विद्युत वायरिंग आणि फिटिंग्ज, फर्निचर, कपडे, घरगुती वस्तू, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, सजावटीच्या वस्तू आणि स्वयंपाकघराचे नुकसान झाले. आग शेजारच्या अपार्टमेंटमध्येही पसरली होती. अग्निशमन दलाने ४ तासात या आगीवर नियंत्रम मिळवले. शेजारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, लग्नाच्या विधींसाठी घराच्या मंदिरात दिवा लावण्यात आला होता. या दिव्यानेच आग पेटवली. कुटुंबातील एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितले की, फक्त दोन महिला - भावना भारत सत्रा (६२), एका विकासकाची पत्नी आणि अनेरी जितेंद्र सत्रा (३४) अपार्टमेंटमध्ये होत्या, तर कुटुंबातील इतर सदस्य टेरिसवर होते. या आगीत भावना भारत सत्रा यांचं निधन झाले. अनेरी या १० टक्के भाजल्या गेल्यात. त्यांच्यावर नानावटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai Fire
मोठी बातमी! CM फडणवीस अचानक अमित शाहांच्या भेटीला, राष्ट्रवादीच्या विलिनिकरणार निर्णय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com