मोठी बातमी! CM फडणवीस अचानक अमित शाहांच्या भेटीला, राष्ट्रवादीच्या विलिनिकरणार निर्णय?

NCP merger latest news Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
Eknath Shinde, CM Devendra Fadnavis , Amit Shah
Eknath Shinde, CM Devendra Fadnavis , Amit Shahsaam tv
Published On

CM Devendra Fadnavis Delhi Visit : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये अमित शाह आणि भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचाही दिल्ली दौरा होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. (Devendra Fadnavis meeting Amit Shah Delhi NCP merger discussion details)

राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनिकरण होणार?

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाच्या चर्चेला राज्यात जोर आला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् अजित पवार यांच्यामध्ये विलीनि‍करणावर बैठका झाल्याचा दावा केला जातोय. त्यातच आता देवेंद्र फडणवीसही अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीसाठी रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा आणि सुनेत्रा पवारांचा आगामी दिल्ली दौरा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde, CM Devendra Fadnavis , Amit Shah
ZP Election Result : पुणे जिल्हा परिषदेचा 'दादा' राष्ट्रवादीच, वाचा आतापर्यंतच्या विजयी उमेदवाराची यादी

देवेंद्र पडणवीस यांच्या या तातडीचा दिल्ली दौरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबतच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. पुढील काही दिवसात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार का? यावर राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. विलिनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं सुरू झाली आहेत. त्यामुळेच राज्यात पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत.

Eknath Shinde, CM Devendra Fadnavis , Amit Shah
ZP Election Results : पुण्यात भाजपचा धुव्वा; अजितदादांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाच्या चर्चेला आणखी उधाण आले. मुख्यमंत्र्‍यांकडून दिल्लीमधील भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वांबरोबर भेट घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील लवकर दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनिकरण होणार का? याबाबत राज्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Eknath Shinde, CM Devendra Fadnavis , Amit Shah
मोठी बातमी! लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५००, तर शेतकऱ्यांना ₹६००० मिळणार; या महिन्यात मिळणार लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com