ajit pawar
ajit pawar saam tv

ZP Election Results : पुण्यात भाजपचा धुव्वा; अजितदादांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

Pune ZP election live result updates : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपला मोठा धक्का बसला असून काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. आतापर्यंतच्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यावर वर्चस्व कायम राहणार आहे.
Published on

सचिन जाधव, पुणे प्रतिनीधी, साम टीव्ही

Pune Zilla Parishad election results NCP majority seat count analysis : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ते बसणार, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालेय. आतापर्यंत आलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे जिल्हा परिषदेवर बाजी मारली आहे. बारामती आणि इंदापूर मधून अजून निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक हाती सत्ता येणार हे निश्चित झालेय. पुण्यात भाजपला जरोदार धक्का बसलाय. भाजपला अद्याप दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले होते. आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. दुपारी अडीच वाजेपर्यंत ६० जागांचा निकाल हाती आला आहे. आतापर्यंतच्या निकालानसुरा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेचा मॅजिक फिगर पार केलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपचे फक्त ८, शिवसेना ४, ठाकरेंची शिवसेना ७ जागांवर विजय मिळवला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकच उमेदवार निवडून आलेय. तर काँग्रेसला पुण्यात खातेही उघडता आलेले नाही.

ajit pawar
ZP Election Result : पुणे जिल्हा परिषदेचा 'दादा' राष्ट्रवादीच, वाचा आतापर्यंतच्या विजयी उमेदवाराची यादी

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर होत असलेल्या पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार होऊ शकला नाही तर भाजपने बाहेरून प्रचारासाठी कोणालाही पाठवले नाही. आतापर्यंत आलेल्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लागणार यात शंका नाही

ajit pawar
ZP election Result : भाजप खासदाराला पराभवाचा धक्का, जिल्हा परिषदेत पत्नीचा दारूण पराभव

पुणे जिल्ह्यात २०१७ ला ७५ गट होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक ४४ जागा निवडून आल्या होत्या. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ७ जागा आणि शिवसेनेला १३ जागा मिळाल्या होत्या. त्याशिवाय इतर गटांना चार जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकला होता. यंदाही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील?भाजपची संख्या वाढेल का तसेच काँग्रेस सेनेचे काय स्थिती राहील याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते... मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्यात जास्त जागा मिळवून एक हाती सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

ajit pawar
ZP Election Result : राज्याच्या मंत्र्यांना जोरदार धक्का, हुकमी एक्क्याचा जिल्हा परिषदेत पराभव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com