

कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने घवघवीत यश संपादन केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबरचा झालेला आहे. हे यश दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यांना आम्ही समर्पित करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे.
सांगली जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली,10 दहा पंचायत समिती निवडणुकीचे मतमोजणी आज पार पडली आहे,यामध्ये ठाकरेंची शिवसेना वगळता सर्वच पक्षांची सत्ता पंचायत समितीवर आली आहे. भाजपाला दोन पंचायत समिती काँग्रेस 2 राष्ट्रवादी शरद पवार गट दोन राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट दोन,राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एक पंचायत समितीवर सत्ता मिळवता आली आहे.तर शिराळा पंचायत समिती वर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली आहे.
भाजपाची एक हाती सत्ता
भाजपाने 15 जागांवर विजय मिळवला
सैदापूर, हजारमाची तांबवे, विंग, कोळे, रेठरे, काले, गोळेश्वर, कोयना वसाहत, शेरे, वाघेरी, , चरेगाव, मसूर, वडोली भिकेश्वर व आटके या ठिकाणी भाजपाच विजय.
आंधळी जिल्हा परिषद गटामध्ये विक्रमी विजय मिळवल्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांची जोरदार मिरवणूक.
आंधळी जिल्हा परिषद गटामध्ये शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे यांचा मोठ्या फरकाने विजय
मावळ तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनी राजकीय चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० अशा एकूण १५ पैकी १५ही जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने मावळात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
लातूर जिल्ह्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा मतदारांनी निवडून दिलेल्या , आणि काँग्रेसला पडलेले मतदान ही लक्षणीय वाढ आहे. मतदारांनी हा जो कौल दिला,त्याचे मी स्वागत करतो अस काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे,तर निवडणुकीपूर्वी बिनविरोध जागा निवडून येणं ही नवी प्रथा महाराष्ट्रत सुरू झाली अशी प्रतिक्रिया आमदार अमित देशमुख यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राधानगरीत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत तायशेटे यांनी विजय मिळवत राधानगरीत काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे. विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. गुलालाची उधळण करत हातात काँग्रेसचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी भव्य विजय रॅली काढली. राधानगरी परिसरात काढण्यात आलेल्या या रॅलीत काँग्रेस समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत अभिजीत तायशेटे यांच्या विजयाचा जल्लोष केला.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शीतल म्हेत्रे तोळनूर पंचायत समिती गणातून विजयी
अक्कलकोट तालुक्यातील भाजपची लाट असताना देखील सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्येने गड राखला.
10 पंचायत समिती साठी - 122 गण
भाजप - 34
राष्ट्रवादी अजित पवार - 19
राष्ट्रवादी शरद पवार - 28
शिवसेना शिंदे - 19
काँग्रेस - 21
शिवसेना ठाकरे - 00
अपक्ष - 1 (शरद पवारांची राष्ट्रवादी पुरस्कृत)
पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भाजपने वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेत ८ पैकी ८ जागांवर भाजपचा निर्विवाद विजय झाला आहे.तसेच पंचायत समितीच्या १६ पैकी १५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, एकमेव जागा ठाकरे गटाने जिंकली आहे.ठाकरे गटाकडून केळवणे मतदारसंघातून वैदिही घरत या एकमेव उमेदवार म्हणून पनवेल पंचायत समितीवर निवडून आल्या आहेत.या निकालामुळे पनवेल तालुक्यात भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले.
मावळमध्ये भाजपचा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दारुण पराभव. 15 पैकी 15 ही जागा जिंकून राष्ट्रवादीने फडकावला झेंडा...
सातारा जिल्हा परिषद 2026 एकुण जागा : 65
सातारा जिल्हा परिषद त्रिशंकू स्थिती
भाजप - 23
राष्ट्रवादी - 22
शिवसेना - 13
ठाकरे गट- 0
काँग्रेस : 1
इतर- 2
- उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपकडून जल्लोष
- भाजपचे माजी आमदार राजन पाटलांनी थोपटले दंड
- मोहोळ तालुक्यात भाजपला मोठे यश
कुरुल जिल्हापरिषद गटासाह मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेल्या यशाचा जल्लोष
माजी आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांचे बंधू संतोष पाटील या दोघांचा ही या निवडणुकीत पराभव
माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात मोहोळ तालुक्यात भाजपचा दणदणीत विजय
मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना मोठा धक्का
राष्ट्रवादीचे जिलध्यक्ष उमेश पाटील यांचा 1 हजार 303 मतांनी पराभव
भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांचा कुरुल जिल्हा परिषद गटात विजय
आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी
शिंदे शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांचा 980 मतांनी केला पराभव
माधवी पडळकर या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी
वाखरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे मयुरी बागल विजयी
भाजपच्या मोनिका काळे यांचा पराभव
पंचायत समितीमध्येही राणेंची एकहाती सत्ता मिळवली आहे
महायुतीने जिंकल्या ८७ जागा
भाजपला ५४ तर शिंदे सेनेने जिंकल्या ३३ जागा
ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 7 जागा
जिल्ह्यातील आठही पंचायत समितींवर महायुतीची सत्ता
भाजप – २६
शिवसेना (शिंदे गट) – १४
ठाकरे सेना (उबाठा) – ३
अपक्ष भाजप बंडखोर – ७
एकूण मोजलेल्या जागा – ५०
आटपाडी तालुक्यातल्या निंबवडे जिल्हा परिषद गटातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आघाडीवर
माधवी पडळकर 630 मतांनी आघाडीवर
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्याताई मोटे आणि माधवी पडळकर यांच्यात काट्याची लढत
जिल्हा परिषद- कोल्हापूर
एकूण जागा - 68
आतापर्यंत 61 पक्षनिहाय विजयी झालेले उमेदवार
भाजप - 12
शिवसेना (शिंदे) - 7
राष्ट्रवादी - 18
काँग्रेस - 13
शिवसेना (ठाकरे) - 1
जनसुराज्य - 5
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4
इतर -
चोपडी जिल्हा परिषद गटातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार हे विजयी झाले आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला .
धाराशिव जिल्हा परिषद पक्षनिहाय आघाडी
55/46
भाजप : 14
शिवसेना : 13
शिवसेना UBT: 7
NCP : 5
NCP SP: 0
काँग्रेस : 2
समाजवादी : 1
MIM: 00
अपक्ष : 4
भाजपचे आमदार राहुल आवडे यांची कन्या सानिका आवाडे विजयी
सनिकाच्या रुपाने आवाडे कुटुंबियांची चौथी पिढी राजकारणात सक्रिय
सानिका जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची असू शकते दावेदार
छत्रपती संभाजीनगर -
- पैठण मधील नऊ पैकी आठ गटावर शिवसेनेचा विजयी.
- तर एका गटात ठाकरे शिवसेना विजयी.ल
- पंचायत समितीच्या 18 पैकी 17 गणावर शिवसेना विजयी तर एक जागेवर राष्ट्रवादी विजयी
- पैठणवर खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे पिता - पुत्राचे वर्चस्व कायम.
लातूर -
भाजप आणि काँग्रेसमध्ये बरोबरीची लढत
दोन्ही पक्षाला समसमान जागा
भाजप काँग्रेसची चुरस वाढली
भाजप 17 जागांवर विजयी
तर काँग्रेस 17 जागांवर विजयी
लातूर जिल्हा परिषद -
एकुण जागा-59/50
भाजप-17
शिवसेना-01
राष्ट्रवादी-10
ठाकरे गट-01
शरद पवार गट -01
काँग्रेस-17
मनसे -01
अपक्ष -02
इतर-
एकूण = 50
पुणे जिल्हा परिषद निकाल -
एकुण जागा - ७३ पैकी ६० जागेचा निकाल
भाजप- ८
शिवसेना- ४
राष्ट्रवादी- ४०
शरद पवार गट - १
ठाकरे गट- ७
काँग्रेस-०
अपक्ष ०
१)छत्रपती संभाजीनगर एकूण (२०)
भाजप : 6
शिवसेना : 6
शिवसेना UBT: 5
NCP : 0
MIM : 1
काँग्रेस : 1
इतर : 1
२)पैठण तालुका (१८)
भाजप : 0
शिवसेना : 12
शिवसेना UBT: 3
NCP : 2
काँग्रेस : 1
इतर :
३)गंगापूर तालुका (१८)
भाजप : 6
शिवसेना : 2
शिवसेना UBT:2
NCP : 5
एमआयएम : 1
इतर : 2
४)वैजापूर तालुका (१६)
भाजप : 3
शिवसेना : 5
शिवसेना UBT: 3
NCP : 3
NCP SP :
Other : 2
५)कन्नड तालुका (१६)
भाजप : 5
शिवसेना : 7
शिवसेना UBT:
NCP :
काँग्रेस : 2
इतर : 2
६)खुलताबाद तालुका (६)
भाजप : 3
शिवसेना :
शिवसेना UBT: 1
NCP : 2
७)फुलंब्री तालुका (८) :
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP : 1
काँग्रेस : 1
८)सिल्लोड तालुका (१८)
भाजप : 5
शिवसेना : 5
शिवसेना UBT:
NCP :
९)सोयगाव तालुका (६) :
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP : 0
डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी)
ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी)
बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी)
आळे : मंगेश काकडे (शिवसेना)
राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना )
सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट )
बारव: मोनाली लांडे (राष्ट्रवादी)
नारायण गाव : नेहा पाटे (शिवसेना)
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विकी चव्हाण विजयी
माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी पुतण्या विक्रम सावंत यांना डावलत नवखा पहीलवान विकी चव्हाण उतरवला होता निवडणूकीच्या आखाड्यात
विकी चव्हाण यांनी कॉग्रेसचे बिबिषण खामकर यांचा केला पराभव
संगमेश्वर तालुक्यातील जिल्हापरिषद गट
सुशिल भायजे धामापूर गट- राष्ट्रवादी अजित पवार
संतोष थेराडे कडवई ( शिवसेना UBT)
विशाखा कुवळेकर कसबा ( UBT)
माधवी गीते मचूरी शिवसेना शिंदे
प्रमोद अधटराव कोसूंब ( भाजपा)
नेहा माने साडवली (शिवसेना UBT)
विलास चाळके - दाभोळे (शिवसेना शिंदे)
पुण्याच्या खेड पंचायत समितीवर उबाठा शिवसेनेची सत्ता १६ पैकी १२ जागांवर विजय
जिल्हा परिषदेलाही पाच जागांवर विजय
आमदार बाबाजी काळेंना यश मात्र बहिणीचा पराभव
गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती आमदार काळेंची झालीय
सातारा - औंध जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या मनिषा फडतरे 40 मतांनी विजयी, जयकुमार गोरे यांच्या वहिनी भारती गोरे यांचा पराभव
संभाजी नगर : वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात अपक्ष उमेदवार सचिन गरड 1 मताने विजयी,
ईव्हीएम मध्ये 17 मतांनी आघाडीवर होता... पण पोस्टल मतदान 16 झालं सगळे मतदान शिवसेना शिंदे यांच्या उमेदवार यांना मिळाले
रिकाउंटिंग मधेही गरड 1 मताने विजयी
लातूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्तेकडे वाटचाल, जिल्हा परिषदेच्या 59 जागा पैकी भाजप 16 जागेवर विजयी तर राष्ट्रवादी अजित पवार गट नऊ जागांवर विजयी, शिवसेना शिंदे गटाची एक जागा, त्यामुळे महायुतीची जिल्हा परिषद वर सत्तेकडे वाटचाल.
परभणी जिल्हा परिषद निवडणूक, गंगाखेड तालुका
भाजप - ५
राष्ट्रवादी - १
धनुष्यबाण - १
कोद्री जिल्हा परिषद सर्कल
*पार्वती प्रल्हाद मुंडे भाजप (विजयी)*
संगीता भगवान सानप अपक्ष
गुंजेगाव जिल्हा परिषद गट
*करुणाताई बाळासाहेब कुंडगीर भाजप (विजयी)*
सुलोचना गोविंद राठोड राष्ट्रवादी
मरडसगाव जिल्हा परिषद गट
*शिल्पा रामराव पाटील NCP (विजयी)*
प्रल्हाद मुरकुटे भाजप
धारसुर जिल्हा परिषद गट
*शोभा सुभाष कदम भाजप (विजयी)*
राणीसावरगाव जिल्हा परिषद गट
*सय्यद अल्ताफ भाजप (विजयी)*
श्रीनिवास मुंडे मशाल (पराभूत)
महातपुरी जिल्हा परिषद सर्कल
*कुशावर्ती संभाजी पोले भाजप (विजयी)*
फड धनुष्यबाण
इसाद जिल्हा परिषद सर्कल
*सावित्री राजेश फड धनुष्यबाण (विजयी)*
देवशाला सोपान बडे भाजप
रत्नागिरी- मनसेनेनी रत्नागिरी जिल्हा परिषदेत खाते खोलले
जिल्हा परिषद निवडणुकीतच्या रिंगणात असलेला एकमेव उमेदवार विजयी
शृंगारतळी गटातून मनसेचे प्रमोद गांधी विजयी
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतमोजणी दरम्यान पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
गर्दी अनियंत्रित झाल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ
पोलिसांनी सूचना देऊन सुद्धा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केले
रायगड ब्रेकिंग :
० भरत गोगावले यांनी गड राखला
० रायगडच्या महाड, पोलादपुर राष्ट्रवादी आणि भाजप मोठा धक्का
० महाडमध्ये 5 आणि पोलादपुरमध्ये 2 म्हणजे सर्वच्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी
० भाजप चे प्रविण आणि राष्ट्रवादी चे सुनिल तटकरे यांची प्रतिक्षा पणाला लागली होती
सांगली..
कडेगाव तालुक्यामध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचा करिष्मा
कडेगाव तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी
तर कडेगाव पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 7 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी तर केवळ एका जागेवर भाजपचा विजय
कडेगाव पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता
जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस कडुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या सून मोनाली अमोल लांडे या घडाळ्याचा चिन्हावर विजयी झाल्या. त्यानंतर अजित दादांचा फोटो हातात घेऊन देवराम लांडेनी अशा पद्धतीने जल्लोष केला. देवराम लांडे नेहमीचं या-ना-त्या कारणाने चर्चेत असतात, विजयी जल्लोषात ही तोच कित्ता त्यांनी गिरवला.
उचगाव मतदार संघात एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा भाजप उमेदवार विजयी
शिरुर पुणे
रांजणगाव गणपती - कारेगाव गट
स्वाती पचुंदकर (भाजप) विजयी
रांजणगाव गणपती गण
सागर दरेकर (भाजप) विजयी
कारेगाव गणातुन
मनीषा पाचंगे (भाजप)विजयी
*तर कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांचा कारेगाव गणातुन पराभव*
सांगली - आटपाडी तालुका
करगणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विनायक मासाळ विजयी
करगणी पं.स गणात शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय पाटील विजयी.
माडगुळे पंचायत समिती गणातून भाजपाचे- दादासाहेब मोटे विजयी
खरसुंडी जिल्हा परिषद गटात शिंदेसेनेचे जयदीप भोसले विजयी
खरसुंडी पंचायत समिती गणात शिंदे सेनेच्या मीनाक्षी पुजारी विजयी
नेलकरंजी पंचायत समिती गणात शिंदेसेनेच्या सुनीता सरगर विजयी..
जिल्हा परिषद
शिंदे सेना -१
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- १
पंचायत समिती
शिंदे सेना -३
भाजप - १
जिल्हा परिषद निकाल: जुन्नर तालुका
गट. विजयी उमेदवार. पक्ष
डिंगोरे सोनाबाई दाभाडे. राष्ट्रवादी
ओतूर. छाया तांबे. राष्ट्रवादी
आळे. मंगेश अण्णा काकडे. शिवसेना
राजुरी. स्मिता कणसे. शिवसेना
बोरी. कल्पना काळे. राष्ट्रवादी
नारायणगाव नेहा पाटे. शिवसेना
सावरगाव. गुलाब पारखे. शिवसेना (ठाकरे )
बारव. मोनाली लांडे. राष्ट्रवादी
---
राष्ट्रवादी- ठाकरे आघाडी ५ जागा
शिवसेना-०३
तेर जिल्हा परिषद गटात अर्चना पाटील 2328 मतांनी विजयी
धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाची लढत असलेल्या तेर गटात अर्चना पाटील विजयी
अर्चना पाटील भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी
शरद पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर विरुद्ध अर्चना पाटील यांची होती लढत
अर्चना पाटील यांच्या उमेदवारी बद्दल धाराशिव जिल्ह्यात घराणेशाहीचा झाला होता आरोप
वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटलांचा करिष्मा कायम..
जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 07 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी.
महायुतीचे चार उमेदवार विजयी.
बागणी जिल्हा परिषद गटातून आमदार सदाभाऊ खोत यांची सून विजयी
महायुतीतील रयत क्रांती संघटनेच्या मोहिनी सागर खोत विजयी
परंडा तालुक्यातील जवळा गटातून बंडखोरी करत भाजप पुरस्कृत अपक्ष लढवली होती निवडणूक
जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे विजयी
धनंजय सावंत यांनी बंड करून लढवल्या आहेत, भूम परंडा वाशी मतदार संघात जागा, भूम परंडा वाशी आमदार तानाजी सावंत यांचा मतदारसंघ
धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या लढतीमध्ये धनंजय सावंत यांची लढत
माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात धनंजय सावंत यांनी लढवली जिल्हा परिषदेची निवडणूक
संजय मंडलिक यांना धक्का
कागल मध्ये जिल्हा परिषदेच्या सहाही जागांवर मुश्रीफ आणि दोन्ही घाटगे गटाच्या उमेदवारांचा विजय
तसेच पंचायत समितीच्या 11 जागांवर विजय
संजय मंडलिक यांच्या वाटेला केवळ 1 पंचायत समितीची जागा
परभणीचे भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच जण या निवडणुकीमध्ये उभे होते जातील मुलगी सोनल देशमुख या झरी जिल्हा परिषद गटातून मशालच्या चिन्हावर उभ्या होत्या त्यांचा पराभव भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख यांनी केलाय दुसरीकडे त्यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते त्या ठिकाणी मशाल या चिन्हावर उभे असलेले पांडुरंग खिल्लारे यांनी समशेर भरपूर कर यांचा पराभव केला आहे दुसरीकडे त्यांच्या सुनबाई प्रेरणा वरपूडकर या दैठणा जिल्हा परिषद गटातून उभे होत्या त्या ठिकाणीही काँग्रेसच्या ज्योत्स्ना गणेश घाडगे यांनी त्यांचा पराभव केलाय त्यामुळे वरपूडकर यांचे घरातील तीनही उमेदवार पराभूत झाले दुसरीकडे लोहगाव जिल्हा परिषद गटात दोन पुतणे उभे होते ज्यातील काँग्रेसच्या चिन्हावर उभे असलेले अजित वरपूडकर यांनी भाजपकडून उभे असलेल्या ऐश्वर्य वरपुडकर यांचा पराभव केलाय
कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुसंडी
ढालगाव जिल्हा परिषद गटातून विकास हक्के विजयी
तर कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या नागज गणातून वामन कदम आणि ढालगाव गणातून रविकिरण घागरे विजयी
काँग्रेसने आतापर्यंत 12 जागावर विजय
दुसऱ्या क्रमांकवर राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा मिळवल्या
भाजप 7, शिवसेना 7, जनसुराज्यने 4 जागा मिळवल्या
ठाकरे 2 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक
लिंब गटाचा निकाल हाती
लिंब गटातून सर्जेराव सावंत विजयी
लिंब गणातून प्रभाकर पवार विजयी
कोंढवे गणातून महेश गाडे विजयी
लिंब गटातून तीनही भाजपचे उमेदवार विजयी
आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी पंचायत समिती गण मधील शिंदे सेनेच्या सुनीता सरगर विजयी
खरसुंडी पंचायत समिती गण मधील शिंदे सेनेच्या मीनाक्षी पुजारी विजय
पेड पंचायत समिती गणातून अजित पवार राष्ट्रवादीचे प्रमोद शेंडगे विजय
कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या नागज पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे उमेदवार वामन कदम याचा विजयी
शिराळा तालुक्यातील पणुब्रे वारुण पंचायत समिती मधील भाजप च्या उमेदवार सुनीता मनोज चिंचोलकर विजयी.
पळसप जिल्हा परिषद गटात अजित लाकाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत सुरुवातीला भारतीय जनता पार्टी कडून नेताजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, उमेदवारी जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष व राडा झाला. या पार्श्वभूमीवर एनवेळी उमेदवार बदलण्याचा निर्णय घेत अजित लाकाळ यांना उमेदवारी देण्यात आली.
पलूस तालुक्यातल्या कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड विजय
ऋषिकेश लाड काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे
लोहारा तालुक्यातील कानेगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा सतीश पाटील विजयी
शिवसेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील यांच्या मातोश्री आहेत सुवर्णा पाटील
सुवर्णा पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती सभा
संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी ही ताकद लावली होती पण आला
माळशिरस मध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना मोठा धक्का...
भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते अकराशे मतांनी विजयी झाले आहेत.
पांडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या रश्मी बागल विजयी
रश्मी बागल या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात.
शरद पवार गटाच्या राणी माने यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे
माडखोल जिल्हा परिषद सह दोन्ही पंचायत समितीवर अपक्षांनी मारली बाजी
शिवानी नाईक- माडखोल जि.प.
अवनी राऊळ- माडखोल पंचायत समिती
प्रथमेश सावंत- कलंबिस्त पंचायत समिती विजयी..
माण तालुक्यातील कुकडवाड गटात मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे पिछाडीवर...राष्ट्रवादीचे अनिल देसाई 300 मतांनी आघाडीवर
मतमोजणीची जशी प्रक्रिया सुरू झाली तसेच इकडे कार्यकर्ताचा उत्साह शिगेला जाताना पाहायला मिळत असून परांडा मतमोजणी केंद्राच्या जवळ कार्यकर्त्यांनी अक्षरशः जल्लोष करायला सुरुवात केली.
सांगली जिल्हा परिषद 61 गट निवडणूक निकाल - आघाडी
भाजपा - 10
राष्ट्रवादी अजित पवार - 02
शिवसेना शिंदे - 02
काँग्रेस - 01
राष्ट्रवादी शरद पवार - 01
शिवसेना ठाकरे गट -
सांगली 10 पंचायत समिती 122 गण- आघाडी
भाजपा - 05
राष्ट्रवादी अजित पवार - 02
शिवसेना शिंदे - 02
काँग्रेस - 02
राष्ट्रवादी शरद पवार - 01
शिवसेना ठाकरे गट - 00
कोल्हापूर
जिल्हा परिषद- कोल्हापूर
एकूण जागा - 68
कल
भाजप - 6
शिवसेना (शिंदे) - 5
राष्ट्रवादी - 8
काँग्रेस - 10
शिवसेना (ठाकरे) -
जनसुराज्य - 3
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
इतर -
पंचायत समिती -
एकूण जागा - 136
कल - (किती जागांचा)
भाजप - 12
शिवसेना (शिंदे) - 10
राष्ट्रवादी - 16
काँग्रेस - 20
शिवसेना (ठाकरे) -
जनसुराज्य - 6
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 2
इतर -2
भारतीय जनता पार्टीचे काक्रंबा गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार दयानंद शिंदे विजयी
थेट विद्यार्थी चळवळीतून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरलेला युवा चेहरा विजयी
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अस्मिता कांबळे यांना उघडून भाजपने नव्या चेहऱ्याला दिली होती संधी
धाराशिव:
परंडा तालुक्यात शिंदे गटाने खाते उघडले
शिवसेना शिंदे गटाचे अमर सुभाषराव मोरे जिल्हा परिषद गटातून विजयी
रेश्मा गायकवाड शेळगाव विजय शिवसेना शिंदे गट पंचायत समिती गण
गणेश बापूराव भिलारे शेळगाव गण पंचायत समिती गण विजय
पानगाव जिल्हा परिषद गटात मनसेचे सुनील नागरगोजे विजय, पंचायत समिती गणात मनसेच्या श्रीदेवी गालफड विजयी
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गटातून भाजपाच्या शीतल ढाले विजयी
जिल्हा परिषद व पंचायत समिती भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी
धाराशिव जिल्ह्यातील ईटकुर जिल्हा परिषद गटातून
शिंदे यांची शिवसेना विजयी
शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत पिंटू लंगडे विजयी
एकूण जागा - 61
भाजप - 6
शिवसेना (शिंदे) - 4
राष्ट्रवादी (अजित पवार) - 01
कॅांग्रेस - 01
शिवसेना (ठाकरे) -
राष्ट्रवादी (शरद पवार) 01
इतर -
पानगाव पंचायत समिती गटात मनसेच्या श्रीदेवी गालफाडे विजयी.. मनसेनं लातूरमध्ये खाते उघडले
सातारा पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने खाते खोललं... भाजपला मोठा धक्का..
शिवथर गणातून राष्ट्रवादीचे राजेश पवार 376 मतांनी विजयी ...
धाराशिव जिल्हा परिषदेतील पहिला कौल हाती
ढोकी जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीवर
तीर्थराज गाडगे हे आघाडीवर
तर पंचायत समिती साठी उभाठा शिवसेने अमर समुद्रे 519 मतांनी विजयी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी :
६३ पैकी
भाजप : ६
शिवसेना : ४
शिवसेना UBT: २
NCP : ३
काँग्रेस : २
वंचित :
MIM:
अपक्ष :
माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटात अजित पवाराच्या ncp च्या अश्विनी दळवे विजयी
कराडला मतमोजणी केंद्रावर पोलीस आणि उमेदवारांच्यात बाचाबाची
दहा वाजता आलेल्या उमेदवाराला मतमोजणी केंद्रावर प्रवेश नाकारला
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा केला जाहीर निषेध
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला अडवले
निवडणूक निर्णय अधिकारी मनमानी करत असल्याचा थेट आरोप
रत्नागिरी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीमध्ये
शिंदे शिवसेना- 88
ठाकरे शिवसेना- 95
भाजप- 30
अजित पवार गट राष्ट्रवादी- 37
काँग्रेस- 16
शरदचंद्र पवार गट- 1
मनसे- 6
बसपा- 9
एकूण जागा - 68
कल
भाजप - 1
शिवसेना (शिंदे) -
राष्ट्रवादी - 2
काँग्रेस - 03
शिवसेना (ठाकरे) -
जनसुराज्य - 2
इतर -
पंचायत समिती - (पंचायत समितीचे नाव)
एकूण जागा - 136
कल किंवा निकाल - (किती जागांचा)
भाजप - 2
शिवसेना (शिंदे) -
राष्ट्रवादी - 4
काँग्रेस - 06
शिवसेना (ठाकरे) -
जनसुराज्य - 4
इतर -
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती टपाली मतमोजणीत अजित पवार राष्ट्रवादीची आघाडी.
-मावळ तालुक्यात टपाली मतमोजणी सुरुये
शिवसेना शिंदे 2 आघाडीवर
शिवसेना ठाकरे 3 आघाडीवर
काँग्रेस 1 आघाडीवर
माळशिरस येथील 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणासाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरवातीला टपाली मतमोजणी सुरू झाली आहे.
दहिगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आणि शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांच्यामध्ये लढत होणार आहे.
उचगाव जिल्हा परिषद मतदार संघ आणि बावड्यात दोन ठिकाणी जिल्हा परिषद मतदार संघ आघाडीवर
धाराशिव मतमोजणी केंद्रावर गोंधळ
राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये गोंधळ
उमेदवार प्रतिनिधीला ही आत मध्ये सोडलं जात नसल्याचा आरोप
तासाभरापासून आम्हाला गेटवरच अडवला असल्याचा आरो
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आम्ही बाहेर आहोत
आम्हाला गेटवर ठेवूनच सत्ताधारी पक्षाकडून निकाल लावायचा आहे का संतप्त सवाल
उत्तर पुणे जिल्ह्यात टपाली मतदानात अजित पवार राष्ट्रवादीची आघाडी.
जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यात टपाली मतमोजणी सुरु
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असुन सुरवात झाली असुन टपाली मतमोजणी सुरु करण्यात आलीय पुढील दोन तासांत सर्व निकाल हाती येतील असा विश्वास निवडणूक आधिकारी अनिल दौंडे यांनी व्यक्त केलीय पुणे जिल्हात राष्ट्रवादी कॉग्रेस सत्ता राखणार का हे पहाणं महत्वाचे ठरणार आहे
माण तालुक्यातील आंधळी गणातील भाजप उमेदवार अर्जुन काळे बिनविरोध
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक मतमोजणीला सुरुवात
सुरवातीला टपाली मतमोजणी सुरू
250 टेबलांवर सुरू झाली मतमोजणी
हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक 22 फेऱ्या होणार
मतदान केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
पुणे, सोलापूर, कोल्हापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडालाय. मतमोजणीला सुरूवात जाली आहे. थोड्याच वेळात कुणाकडे सत्तेच्या चाव्या असतील, हे स्पष्ट होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गट आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी सात तारखेला मतदान पार पडले आणि आज मतमोजणीला सुरुवात होत आहे, साताऱ्यातील एमआयडीसी परिसरातील शासकीय गोदामात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल, साताऱ्यात चारही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, नेमका मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल
परभणी जिल्ह्यातील 54 जिल्हापरिषद आणि 108 पंचायत समिती गणासाठी आज मतमोजणी होणार आहे थोड्या वेळात ही मतमोजणी सुरू होणार आहे आपण पाहिले तर 54 जिल्हापरिषद जागेसाठी 247 उमेदवार रिंगणात होते तर 108 पंचायत समिती गणासाठी 433 उमेदवार रिंगणात होते ह्या सर्वांचे भविष्य आज ठरणार आहे जिल्हा 74.89 % मतदान झाले आहे आणि या मत मोजणी कडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे प्रशासनाच्या वतीने पुन्ह तयारी झाली असून केंद्र बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जिल्ह्यात 9 तालुक्यात मतमोजणी होणार आहे याचाच आढावा घेतला आहे
कराड तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट व 24 पंचायत समिती गणाच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार असून पंचवीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे
कराडच्या रत्नागिरी शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणी ची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी 230 कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे
मतमोजणी 25 फेऱ्यात पूर्ण होणार असून मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांचे उमेदवारांची प्रतिनिधी मतमोजणी ठिकाणी हजर आहे
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी बारामती मधील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार
सकाळी दहा वाजता होणार मतमोजणीला सुरुवात
बारामती मधील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणाच्या उमेदवारांच्या मतदानाची होणार मतमोजणी
जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीकरिता ४३ उमेदवार रिंगणात
,
जिल्हा परिषद गटामध्ये सुपा ३, गुणवडी ३, पणदरे ९, वडगाव निंबाळकर ५, निंबूत ६ आणि नीरावागज ५ असे एकूण ३१ उमेदवार
सुपा २, काऱ्हाटी २ , शिर्सुफळ ३, गुणवडी ४, पणदरे ६, मुढाळे ३, मोरगाव ३, वडगाव निंबाळकर ७, निंबुत ७, कांबळेश्वर २, नीरावागज २, डोर्लेवाडी २ असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर बहुमताचा कौल कुणाला मिळणार
मतमोजणी काहीच वेळात सुरुवात सुरुवात होई
जिल्ह्यात नऊ ठिकाणी मतमोजणी, 20 टेबल आणि 19 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी
सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी २ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
जिल्हा परिषदेचे 56 गटांसाठी 151 उमेदवार रिंगणात
112 पंचायत समिती गण - 321 उमेदवार रिंगणात
जिल्ह्यात 55.79 टक्के इतके झाले होते मतदान
मतदार कुणाला कौल देणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल
सोलापूर जिल्हा परिषदेचे आजच्या मतमोजणीनंतर कारभारी ठरणार आहेत. आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषदच्या 68 जागांसाठी 271 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 485 उमेदवार रिंगणात आहेत.
भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा या उत्रौली - कारी गटातून भाजपकडून मैदानात उतरल्या आहेत. त्यांचा सामना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी आहे.
शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढत आहेत.
जुन्नर तालुक्यातील बोरी - खोडद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सूनबाई कविता पवार यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला थेट आव्हान दिले आहे.
आंबेगावात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील आणि अरुण गिरे यांच्या अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्र लढत आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांसमोर लढत आहेत.
खेडमध्ये भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील यांच्या विरोधात आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैद असून, शिंदेसेनेच्या निशा गोरे देखील रिंगणात आहे.
दौंड तालुक्यातील खडकी गटात दिवंगत माजी आमदार कृष्णराव जगदाळे यांचे पुत्र वीरधवल हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तसेच, बोरीपार्धी गटात माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे.
इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज भरणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे.
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 73 जागांसाठी 299 उमेदवार तर पंचायत समितीच्या 146 जागांसाठी 528 उमेदवार रिंगणात होते या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीतुन समोर येणारच आहे मात्र यावेळी मतदानाचा वाढलेला टक्का आणि पक्षीय बलाबल यामुळे याचा फायदा कुनाला होणार याकडे सर्वाचे लक्ष असुन अजित पवारांच्या अकाली निधनानंतर पुणे जिल्ह्यात सहानुभूतीची होती याचा थेट फायदा राष्ट्रवादी कॉग्रेसला होणार हेही पहाणं महत्वाचे ठरणार आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी याच मतमोजणी परिसरात गोंधळ झाला होता. पोलिसांनी लाठीचार केला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून या मतमोजणी केंद्राच्या परिसरातला हॉटेल विक्स ते गाडी चौक हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. पोलिसांचा मोठा पाऊस फाटा तैनात करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दहा जिल्हा परिषद सर्कल आणि 20 पंचायत समिती गणासाठी झालेल्या मतांची या ठिकाणी मोजणी होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते समर्थक येतील अशी शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी १० वाजता सुरू होईल. दोन फेऱ्यांमध्ये एका गटाचा निकाल हाती येईल. सर्वसाधारणपणे दुपारी १२ वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्यातील एक ते दोन गटांचे निकाल जाहीर होतील. प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली असून, २५० टेबलांवर १८८ फेऱ्या होणार आहेत. हातकणंगले तालुक्यात २२ फेऱ्या, तर उर्वरित सर्व तालुक्यांत १० ते १५ फेऱ्यांमध्ये निकाल हाती येईल. जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शनिवारी चुरशीने मतदान झाले. मतांची टक्केवारी जरी गेल्या वेळेपेक्षा कमी झाली असली, तरी राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचली आहे. त्यामुळे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.
राज्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारी दोन वाजेपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा कारभारी ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.