ZP Election Result : राज्याच्या मंत्र्यांना जोरदार धक्का, हुकमी एक्क्याचा जिल्हा परिषदेत पराभव

Satara ZP election latest results : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीत घराणेशाहीला मतदारांनी नकार दिल्याचे चित्र दिसत आहे. साताऱ्यात मंत्री मकरंद पाटील यांच्या गटाला धक्का बसला असून तळदेव गटात शिंदे सेनेचे अजित सपकाळ विजयी झाले. सोलापूरमध्येही अनेक बड्या नेत्यांच्या नातेवाईकांना पराभव पत्करावा लागला.
Ajit Sapkal victory Taldev group Satara ZP election
Ajit Sapkal victory Taldev group Satara ZP electionSaam
Published On

Ajit Sapkal victory Taldev group Satara ZP election : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी घराणेशाहीला नाकारल्याचे चित्र आहे. सोलापूरमध्ये आमदार, खासदारांच्या नातेवाईकांना पराभवाचा धक्का बसलाय. साताऱ्यात (Satara Zilla Parishad election news) मंत्री मकरंद पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. जिल्हा परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मकरंद पाटील यांच्या जवळच्या नेत्याचा पराभव केला आहे. तळदेव गटात पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. अजित सपकाळ यांनी विजय मिळवलाय. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गट आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी सात तारखेला मतदान पार पडले, आज मतपेट्या उघडल्या जात असून अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत. दरम्यान, माण तालुक्यातील कुकडवाड गटात मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे पिछाडीवर आहेत.

Ajit Sapkal victory Taldev group Satara ZP election
ZP Election Result: झेडपीचा पहिला कल अजितदादांच्या बाजूने, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पहिल्या तासातच विजय

राज्याचे मंत्री मकरंद पाटील यांना होमग्राऊंडवर धक्का बसलाय. महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटात शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार अजित सपकाळ यांनी विजय खेचून आणला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय गायकवाड यांचा पराभव केला आहे. तळदेव गटातून निवडून आलेले अजित सपकाळ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत.

Ajit Sapkal victory Taldev group Satara ZP election
ZP election Result : विजय पाहण्यासाठी अजितदादा हवे होते, उमेदवाराच्या डोळ्यात आले टचकन पाणी

साताऱ्यात आतापर्यंत कोण कोण जिंकले? वाचा यादी

  • खेड गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार कामेश कांबळे विजयी झाले. भाजपचे उमदेवार संदीप शिंदे पराभूत झालेत.

  • वाठार स्टेशन गटात राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री भोसले विजयी..

  • महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेने खाते उघडले कुंभरोशी गणातील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे उमेदवार संजयराव मोरे विजयी झाले आहेत. तर ष्ट्रवादीच्या सचिन उत्तेकर पराभूत झाले आहेत.

  • म्हसवे गटातून भाजपाचे वसंतराव मानकुमरे भाऊ २०४७ मंतानी विजयी

  • लिंब गटातून भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी. लिंब गटातून सर्जेराव सावंत विजयी झाले आहेत. तर लिंब गणातून प्रभाकर पवार विजयी झाले आहेत. कोंढवे गणातून महेश गाडे विजयी

  • आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी खटाव गटातील डॉ. प्रिया महेश शिंदे (भाजप) विजयी

  • पाटकळ गणातून राहुल शिंदे भाजप विजयी

  • सातारा पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा विजय

  • शिवथर गणातून राष्ट्रवादीचे राजेश पवार 376 मतांनी विजयी ...

Ajit Sapkal victory Taldev group Satara ZP election
ZP Election Results : धक्कादायक निकाल! सोलापूरमध्ये आमदाराच्या मुलाचा पराभव, खासदाराला जोरदार धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com