

Solapur Malshiras ZP election result Sanskriti Satpute vs Jivan Jankar : सोलापूरमधील माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांना जबरी धक्का बसला आहे. उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन जानकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी विजय मिळवला आहे. संस्कृती सातपुते यांनी जीवन जानकर यांचा ११०० मतांनी पराभव केला. संस्कृती सातपुते यांच्या विजयानंतर माळशिरसमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय. गेल्या वर्षी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा सातपुते यांनी काढल्याची चर्चा माळसिरसमध्ये (Malshiras political news today) सुरू आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत अनेक धक्कादायक निकाल लागले आहे. (BJP vs NCP Maharashtra local elections)
माळशिरस-आकलूजमध्ये ताकद असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाही जोरदार धक्का बसला आहे. गुरसाळे पंचायत समिती गणात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा धक्का भाजपने दिलाय. या ठिकाणी भाजपचे बाळासाहेब शेळके विजयी झाले आहे. पंचायत समितीत अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा दारूण पराभव झालाय.
पंढरपुरात शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनाही जोरदार धक्का बसला आहे. करकंब जिल्हा परिषद गटातून भाजपचे आदिनाथ देशमुख यांनी विजय मिळवलाय. या विजयानंतर भाजपकडून पंढरपूरमध्ये जोरदार जल्लोष केला. मिरवणूक काढण्यात येत आहे. गुलला उधळला जातोय.
करमाळ्यातील पांडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या रश्मी बागल विजयी झाल्या आहेत. रश्मी बागल या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात. शरद पवार गटाच्या राणी माने यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे. तर माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे पृथ्वीराज सावंत विजयी झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.