Raebareli Accident
Raebareli Accident

Accident : भंडारा खाऊन घरी निघाल्या, वाटेतच ८ जणींना कारने चिरडले, ४ जणींचा जागीच मृत्यू, ४ गंभीर

Ganga Expressway accident news : रायबरेली येथे गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात ८ मुलींना भरधाव कारने चिरडले. यात ४ मुलींचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
Published on

Raebareli Accident Latest Marathi News : भंडाऱ्यात जेवण केल्यानंतर ८ मैत्रिणी चालत घरी निघाल्या होत्या. त्याचवेळी एका भरधाव कारने सर्व मुलींना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात ४ मुलींचा जागीच मृत्यू झाला तर ४ जणींची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. उततर प्रदेशमधील रायबरेलीत गंगा एक्सप्रेसवेवर सुलतानपूर जनौली येथे हा भंयकर अपघात झालाय. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढलाय. जगतपूर पोलिसांकडून या गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालकाचा तपास केला जात आहे. अपघातात जखमी झालेल्या ४ जणींवर सध्या जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (Raebareli Ganga Expressway accident latest update)

८ मुलींना एका भरधाव कारने चिरडल्याची माहिती मिळताच कोडेर गावात खळबळ उडाली. संतप्त गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पण तोपर्यंत चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. गावकऱ्यांनी पोलिसांना तात्काळ याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करत कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. जखमींना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोडेर गावातील अनेकलोक चुली गावात भंडाऱ्यासाठी गेले होते. भंडारा झाल्यानंतर त्या मुली चालत घराकडे येत होत्या. त्यावेळी काळाने घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हते झाले.

Raebareli Accident
३ लाखांची गुंतवणूक, ८ लाखांचा नफा! पावणेदोन एकरात दोडक्याने चमकवलं नशीब; वाचा नांदेडच्या प्रकाशची यशोगाथा

पोलिसांनी सांगितले की, हिमांशी (२३) आणि शालिनी (२२) या दोन जणींचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण रस्त्यातच रश्मी (१४) आणि आस्मा (२२) यांचा मृत्यू झाला. रिया पटेल (१४), प्रिया पटेल (१२), साधना (९), मीना (२२) आणि रेश्मा (१४) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जखमी मुलींचा जबाब घेतला आहे. त्यावरून नेमकं काय झाले? याचा तपास केला जात आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात आहेत.

Raebareli Accident
पार्टीवरून परतताना काळाचा घाला! कार-ट्रकच्या धडकेत ३ तरुण ठार, ४ जणांची मृत्यूशी झुंज

अपघातानंतर चालक कार सोडून पळून गेला. पोलिसांकडून त्याचा तपास केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाअधिकारी अन् एसपी यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी जखमींवर चांगल्या उपचारांचे आदेश दिले. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, काम सुरू असलेल्या गंगा एक्सप्रेसवेवर वेगाने येणाऱ्या कारमुळे हा अपघात झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि चार जण जखमी झाले आहेत. वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

Raebareli Accident
Ladki Bahin Yojana : सावधान! लाडकी बहीण योजनेचा ₹१५०० हप्ता बंद होणार? eKYC करताना आलेल्या मेसेजचा नेमका अर्थ काय? पाहा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com