Ladki Bahin Yojana : सावधान! लाडकी बहीण योजनेचा ₹१५०० हप्ता बंद होणार? eKYC करताना आलेल्या मेसेजचा नेमका अर्थ काय? पाहा...

How to fix eKYC error in Maharashtra Ladki Bahin Yojana portal : लाडकी बहीण योजनेत ‘हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही’ असा मेसेज दिसत असेल तर त्याचा नेमका अर्थ काय? ₹१५०० हप्ता मिळणार की नाही? EKYC पोर्टल, मुदतवाढ आणि लाभार्थींसाठी महत्त्वाची माहिती वाचा.
Ladki Bahin Yojana eKYC update
Ladki Bahin Yojana eKYC updateSaam tv
Published On

What does Aadhaar not in eKYC correction list mean Ladki Bahin scheme : ईकेवायसी केली पण खात्यात १५०० रूपये आले नाहीत, केवायसी करताना चूक झाली? केवायसी पोर्टल चालूच नव्हते.. यासारख्या तक्रारीचा पूर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाडक्या बहि‍णींचा होता. काही जिल्ह्यांमध्ये तर लाडक्या बहि‍णींनी सरकारी कार्यालयात धडक मोर्चाही केला. त्यामुळे राज्या सरकारकडून आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी पोर्टल सुरू केले आहे. पण अजूनही केवायसी करायला गेलेल्या लाडक्या बहि‍णींना अडचणींचा सामना करावा लागतोय. 'हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही', (Will I get ₹1500 if Aadhaar not in eKYC list message appears)असा स्पष्ट मेसेज ईकेवायसी करताना पोर्टलवर दिसत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींच्या मनात पुन्हा एकदा शंकेचे काहूर सुरू झाला आहे. 'हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही', याचा अर्थ काय? आम्हाला १५०० मिळणार नाहीत का? असा सवाल लाडक्या बहिणींकडून उपस्थित केला जात आहे. (Ladki Bahin scheme payment date latest update)

'हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही, याचा नेमका अर्थ काय? Ladki Bahin scheme eKYC last date and correction process details

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ईकेवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. पण अनेकांची केवायसी रखडली अथवा चुकीची झाली. त्यामुळे महिलांकडून संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत होता. त्यामुळे आता सरकारकडून पुन्हा एकदा ईकेवायसी पोर्टल सुरू कऱण्यात आले आहे. केवायसी करण्याची महिलांना आणखी एक संधी सरकारकडून देण्यात आली आहे. ज्या महिलांनी चुकीच माहिती भरलेली आहे अथवा केवायसी केलेलीच नाही, त्या महिलांसाठी ई केवायसी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. जर तुम्ही केवायसी आधीच व्यवस्थित केलेली असेल अथवा त्यात कोणतीह चूक नसेल तर आता पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही. ज्यांनी बरोबर केवायसी केलेली आहे, त्यांना 'हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही' असा मेसेज आहे. असा मेसेज आला तर टेन्शन घेऊ नका... तुमची केवायसी पूर्ण झाली असा त्याचा अर्थ होतो.

Ladki Bahin Yojana eKYC update
Saam Exit Poll : ठाकरेंना धक्का की काँग्रेसची मुसंडी? १२ जिल्हा परिषदांच्या एक्झिट पोलची संपूर्ण आकडेवारी

...तर पुन्हा केवायसी करण्याची गरजच नाही -

आधीच केवायसी व्यवस्थित अन् अचूक केली असेल तर पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही. तु्म्ही पात्र असाल अन् केवायसी अचूक झाली असेल तर तुमच्या खात्यावर १५०० रूपये नक्कीच येतील. पण केवायसीसाठी पैसे देण्याची गरज नाही. याबाबत अधिक काही संभ्रम असेल तर माहितीसाठी अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आलेय. ३१ मार्चपर्यंत राज्यातील लाडक्या बहि‍णींना रखडलेली केवायसी पूर्ण करता येणार आहे. केवायसीसाठी ही शेवटची संधी असेल.

Ladki Bahin Yojana eKYC update
Crime : धक्कादायक! भाजप नगरसेवकाच्या तिसऱ्या बायकोची हत्या, चाकूने सपासप वार

केवायसी दुरूस्त करताना योग्य ती काळजी घ्या

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील बहि‍णीसाठी पुन्हा एकदा केवायसी करण्याची संधी दिली आहे. ई केवायसी दुरुस्ती व अपडेट करण्यासाठी सरकारने या लाडक्या बहिणींना मुदत वाढ दिली आहे. दरम्यान शासनाच्या आपले सरकार महा-ई-सेवा केंद्र यासह तहसील कार्यालयात लाडक्या बहि‍णी कागदपत्र घेऊन गर्दी करत आहेत. या लाडक्या बहिणींची योग्य ती दुरुस्ती करून देण्याच्या सूचना हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा व सेवा केंद्रांना दिले आहेत. दरम्यान लाडक्या बहिणींची आर्थिक फसवणूक केल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Ladki Bahin Yojana eKYC update
बँकेतून निघाला पण घरी पोहोचलाच नाही; १० बाय १४ च्या खड्ड्यात असं काय घडलं की होत्याचं नव्हतं झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com